होळीच्या तोंडावर तेल भडकले; दर वाढणार

रशिया आणि युक्रेन युद्धाचे प्रतिकूल परिणाम दिसू लागले
edible oil price
edible oil price sakal

राजापूर : रशिया आणि युक्रेन युद्धाचे प्रतिकूल परिणाम दिसू लागले आहेत. तेलाच्या दरामध्ये गेल्या आठवडाभरामध्ये ५० रुपयांनी वाढ झाली आहे. तेलाच्या दरातच नव्हे तर गहू आणि तांदळाच्या दरामंध्येही वाढ झाली आहे.

शिमगोत्सवाच्या तोंडावर तेलाच्या दराच्या उडालेल्या भडक्याने सर्वसामान्यांना जगणे महाग झाले आहे. युक्रेनमधून जगभरातील अनेक देशांना तेलाचा पुरवठा केला जातो. युद्धस्थितीमुळे युक्रेनमधून होणारा तेलपुरवठा थांबला आहे. त्यामुळे तेलाच्या दराचा भडका उडाला आहे. आठवडाभराच्या कालावधीमध्ये तेलाच्या दरामध्ये ५० रुपयांनी वाढ झाली आहे. रशिया-युक्रेन युद्ध कायम राहिल्यास तेलाच्या दरात आणखीन काही रुपयांनी वाढ होण्याचा अंदाज व्यापार्‍यांकडून व्यक्त केला आहे. शिमगोत्सवाच्या तोंडावर तेलाच्या वाढलेल्या दरामुळे खर्चाचा ताळमेळ बसवायचा कसा, असा सवाल गृहिणींमधून उपस्थित केला जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com