तटकरे बंधू मनोमीलनाचा राष्ट्रवादीला फायदा किती? 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 जानेवारी 2017

रोहा - राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे व त्यांचे बंधू आमदार अनिल तटकरे यांच्यातील मतभेद दूर करण्यात पक्षाध्यक्ष अध्यक्ष शरद पवार यांना यश आले आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत तिकीटवाटपापासून ते प्रत्यक्ष उमेदवार निवडून आणण्यापर्यंत हे मनोमीलन कायम ठेवण्याचे आव्हान या दोन्ही नेत्यांपुढे आहे. 

रोहा - राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे व त्यांचे बंधू आमदार अनिल तटकरे यांच्यातील मतभेद दूर करण्यात पक्षाध्यक्ष अध्यक्ष शरद पवार यांना यश आले आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत तिकीटवाटपापासून ते प्रत्यक्ष उमेदवार निवडून आणण्यापर्यंत हे मनोमीलन कायम ठेवण्याचे आव्हान या दोन्ही नेत्यांपुढे आहे. 

नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी मिळालेले सहा मतांचे काठावरचे मताधिक्‍य भविष्यात कसे वाढवणार, यावर रोहा शहरातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे भवितव्य अवलंबून असणार आहे. दोन्ही नेते दिग्गज असल्याने त्यांनी वेगळे राहिल्यावरही पाठिंबा निर्माण केला आहे. कार्यकर्त्यांच्या पातळीवर या निर्णयाने पडसाद उमटत आहेत. वेळप्रसंगी कडवा विरोध केलेले कार्यकर्ते आता काहीही बोलण्यास तयार होत नाहीत. पहिल्यापासूनच पक्षाला प्राधान्य देणाऱ्या कार्यकर्त्यांना हा निर्णय सकारात्मक वाटत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाला बळकटी मिळेल, असा विश्वास त्यांना वाटतो. 

नगरपालिकेच्या निवडणुकीच्या यशापयशाला बाजूला ठेवत पुन्हा उभारी घेण्याचा प्रयत्न करणारी शिवसेना तालुक्‍यात आता अडचणीत आली आहे. संदीप तटकरे यांच्यासारख्या उमद्या नेतृत्वाला व त्यांच्या पाठीशी असलेल्या कार्यकर्त्यांना गमावल्याचा फटका शिवसेनेला बसणार आहे. त्यातच शेतकरी कामगार पक्षाची राष्ट्रवादीसोबतची आघाडी नक्की झाल्याने शिवसेनेपुढे मोठेच आव्हान उभे राहिले आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेना भाजपचा आधार घेऊ शकते.

कोकण

देवरुख (रत्नागिरी): कोकण म्हटलं, की आजही सर्वांसमोर उभे राहतात उंच हिरवेगार डोंगर, नद्या-खाड्या आणि अथांग समुद्र ! कोकणच्या या...

बुधवार, 16 ऑगस्ट 2017

सावंतवाडी : आरटीओ विरोधात सावंतवाडीत रिक्षा चालकांचे अनोखे भजन आंदोलन केले. सावंतवाडीतच रिक्षा पासिंग व्हाव्यात या...

बुधवार, 16 ऑगस्ट 2017

अलिबाग : येथील समुद्रकिनारी फिरायला आलेल्या रसायनीच्या होमडेकोर कंपनीतील पाच कामगारांपैकी दोघांचा समुद्राला आलेल्या भरतीच्या...

बुधवार, 16 ऑगस्ट 2017