आंतरजिल्हा बदली झालेले शिक्षक कार्यमुक्‍त होणार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 जुलै 2017

अवर सचिवांचे निर्देश - ३३१ शिक्षक परजिल्ह्यात जाणार; रिक्‍त पदांची संख्या वाढणार

कणकवली - आंतरजिल्हा बदलीसाठी पात्र झालेल्या शिक्षकांना तत्काळ कार्यमुक्‍त करा, असे निर्देश राज्य शासनाचे अवर सचिव प्र. शि. कांबळे यांनी सिंधुदुर्गसह रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत. यामुळे सिंधुदुर्गातील आंतरजिल्हा बदलीपात्र ३३१ शिक्षकांना त्यांच्या जिल्ह्यात जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

जिल्ह्यात मे २०१७ अखेरपर्यंत तब्बल ५०० शिक्षकांची पदे रिक्त झाली आहेत. यात आता आंतरजिल्हा बदलीद्वारे आणखी ३३१ शिक्षक बदली होऊन जाणार आहेत. त्यामुळे शिक्षकांची रिक्त पदांची संख्या ८३१ वर पोचणार आहे. 

दरम्यान, मुलांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी, नवीन भरती होईपर्यंत शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या करू नयेत, असा ठराव जिल्हा परिषदेने घेतला होता. त्यामुळे या शिक्षकांच्या बदल्या रखडल्या होत्या. याबाबत शिक्षक संघटनांनी शासनाकडेही दाद मागितली होती. त्यानंतर राज्य शासनाचे अवर सचिव श्री. कांबळे यांनी सिंधुदुर्ग, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील आंतरजिल्हा बदलीपात्र शिक्षकांना कार्यमुक्‍त करण्याचे निर्देश दिले आहेत.

मुख्याध्यापकांना उपशिक्षकांवर नियुक्‍तीची शक्‍यता
जिल्हा परिषदेच्या शाळांमधून ४१५ मुख्याध्यापक पदे सिंधुदुर्गात भरलेली होती, परंतु आता शिक्षण हक्क कायदा लागू झाल्यानंतर मुख्याध्यापकांची पदे घटविण्यात आली. सिंधुदुर्गात मुख्याध्यापकांची फक्त २० पदे ठेवली आहेत. यामुळे ३९५ मुख्याध्यापक अतिरिक्त ठरले आहेत. आंतरजिल्हा बदली पात्र शिक्षकांना कार्यमुक्‍त केल्यानंतर, जिल्ह्यातील शाळांमधील रिक्‍तपदांची संख्या भरून काढण्यासाठी या सर्व मुख्याध्यापकांना असलेल्या शाळेमध्येच उपशिक्षक पदावर सामावून घेतले जाण्याची शक्‍यता आहे, मात्र या सर्व मुख्याध्यापकांना उपशिक्षक पदावर भविष्यात सामावून घेतले गेले, तरीही ४३६ शिक्षकांची पदे रिक्त राहणारच आहेत. त्यामुळे अनेक शाळांत शिक्षकांअभावी शाळांची परिस्थिती बिकट होऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे.

कोकण

सावंतवाडीः सिंधुदुर्गात पावसाने कहर केला आहे. सोमवारी (ता.18) रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात अनेक...

04.36 PM

मंडणगड : तालुक्यात पावसाचा जोर वाढला असून सतत तीन दिवसांपासून पाऊस सुरू असून तालुक्यातील भारजा, निवळी नद्या धोक्याची पातळी...

04.24 PM

मंडणगड : रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यात सकाळी साडेनऊ वाजता वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात ठिकठिकाणी झाडे उन्मळून...

02.18 PM