वादळी पावसाचा तडाखा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 सप्टेंबर 2017

मठ खुर्द येथे चक्रीवादळ - वाघेरीत वीज पडून महिला जखमी
कणकवली - जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाने गडगडाटासह तडाखा दिला. वाघेरी येथे वीज पडून एक वृद्ध महिला जखमी झाली. मठ खुर्द येथे चक्रीवादळाचा तडाखा बसला. जिल्ह्यातील इतर भागातही नुकसान झाले. वेधशाळेने जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्‍यता वर्तविली आहे.

गेले चार-पाच दिवस तर वातावरणातील उष्मा प्रचंड वाढला. यातच वेधशाळेने पुन्हा पावसाची शक्‍यता वर्तवली होती. ही शक्‍यता खरी ठरत आज दुपारनंतर जिल्ह्याच्या अनेक भागांत दमदार पाऊस झाला. याला विजांसह गडगडाटाची जोड होती. काही भागांत यामुळे नुकसानही झाले.

तालुक्‍यात विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले. वाघेरी येथील हौसाबाई बरगे (वय 60) या वृद्ध महिलेच्या अंगावर वीज पडल्याने त्या किरकोळ जखमी झाल्या. वैभववाडी परिसरात पाच-सहा दिवसांपासून गायब झालेल्या पावसाचे आज सायंकाळी दमदार पुनरागमन झाले. तालुक्‍यात सर्वत्र विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. सुमारे तासभर पाऊस सुरू होता. सावंतवाडी शहराला आज पावसाने झोडपले. तालुक्‍यातील विविध ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पाऊस झाला.

Web Title: kankavali konkan news storm rain