आमदार परिचारकांचा कणकवलीत निषेध

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 मार्च 2017

कणकवली - आमदार प्रशांत परिचारक यांचा आज कणकवलीत महिला काँग्रेसच्या वतीने निषेध करण्यात आला. येथील बस स्थानकासमोर राष्ट्रीय महामार्गावर त्यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळण्यात आला. तसेच जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. जवानांच्या पत्नीबाबत अश्‍लील शेरेबाजी करणाऱ्या परिचारक यांना सिंधुदुर्गात पाय ठेवू देणार नाही, असा इशाराही या वेळी महिलांनी दिला.

कणकवली - आमदार प्रशांत परिचारक यांचा आज कणकवलीत महिला काँग्रेसच्या वतीने निषेध करण्यात आला. येथील बस स्थानकासमोर राष्ट्रीय महामार्गावर त्यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळण्यात आला. तसेच जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. जवानांच्या पत्नीबाबत अश्‍लील शेरेबाजी करणाऱ्या परिचारक यांना सिंधुदुर्गात पाय ठेवू देणार नाही, असा इशाराही या वेळी महिलांनी दिला.

जागतिक महिला दिनाच्या औचित्यावर कणकवली तालुक्‍यातील काँग्रेसच्या महिला पदाधिकारी आज काँग्रेस कार्यालयात एकत्र आल्या होत्या. या महिलांनी दुपारी बाराच्या सुमारास बस स्थानकासमोरील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग काही काळ अडवून धरला. या वेळी या महिलांनी ‘आमदार प्रशांत परिचारक मुर्दाबाद, भाजप सरकारचा निषेध असो, परिचारकांची हकालपट्टी झालीच पाहिजे’ अशा घोषणा दिल्या. त्यानंतर परिचारक यांचा प्रतीकात्मक पुतळा दहन केला.

महिला काँग्रेसच्या या आंदोलनात काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा स्वाती राणे, पंचायत समिती सभापती आस्था सर्पे यांच्यासह माजी नगराध्यक्षा मेघा गांगण, जिल्हा परिषद सदस्या श्रीया सावंत, स्वरूपा विखाळे, सायली सावंत, राजलक्ष्मी डिचवलकर, पंचायत समिती सदस्या हर्षदा वाळके, सुजाता राणे-हळदिवे, भाग्यलक्ष्मी साटम, सुचिता दळवी, स्मिता मालडीकर, नगरसेविका सुविधा साटम, माया सांब्ररेकर, देविका दळवी, उर्वी सावंत, पंचायत समितीचे उपसभापती महेश गुरव, पंचायत समिती सदस्य मिलिंद मेस्त्री, महेश लाड, दिलीप तळेकर, बबन हळदिवे आदी उपस्थित होते.

महिला असुरक्षित...
भाजप सरकार सत्तेवर येताच महिलांचा सन्मान करू, अशी आश्‍वासने दिली होती; परंतु भाजपचे आमदार प्रशांत परिचारक हे सैनिकांच्या पत्नीबाबत अश्‍लील विधाने करीत आहेत. सत्ताधारी आमदारांकडून महिलांचा होणारा अपमान ही लाजिरवाणी बाब आहे. यापूर्वी दिल्ली येथील युवतीलाही सतत धमक्‍या येत होत्या. राज्यातील आमदार वर्षा गायकवाड, नीलम गोऱ्हे यांनाही अश्‍लील धमक्‍या दिल्या जात आहेत. आमदार महिलांना धमक्‍या येत असतील तर सर्वसामान्य महिला सुरक्षित राहिलेल्या नाहीत, असे प्रतिपादन या वेळी माजी नगराध्यक्षा मेघा गांगण यांनी केले.

Web Title: kankavali protest to mla prashant paricharak