हंडाभर पाण्यासाठी  आठ मैलांची पायपीट 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 मे 2017

कर्जत - तालुक्‍यातील खारबाची वाडी येथील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी सात ते आठ मैल पायपीट करावी लागत आहे. ही समस्या लक्षात घेऊन ‘युवा प्रबोधिनी मंडळ, मांडवणे’ या सेवाभावी संघटनेने येथे टॅंकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे. 

तालुक्‍यातील अनेक गावे व आदिवासी वाड्या-पाड्यांना मे अखेरीस पाणीटंचाईची झळ जाणवते. जनावरांचेही पाण्याअभावी हाल होत आहेत. खारबाची वाडी परिसरात तर महिला व मुलांना सात ते आठ मैलावरून पाणी आणावे लागत आहे. युवा प्रबोधिनी मंडळाने केलेल्या सर्वेक्षणात ही समस्या दिसून येताच तातडीने बैठक घेऊन तेथे टॅंकर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी संस्थेने लगेच काही आगाऊ रक्कम जमा करून हे काम हाती घेतले. रविवारी मंडळाच्या सर्व सदस्यांनी पाण्याचे टॅंकर आणून गावाला पाणीपुरवठा केला. या वेळी संघटनेने अध्यक्ष किरण कर्णूक, उपाध्यक्ष नितेश मासने, सल्लागार केतन भोसले, खजिनदार अंकुश रेवाळे, सहखजिनदार सागर कर्णूक, सचिव रोहिदास नाईक, सहसचिव रोशन सावंत, सरपंच अंजली गादिवले, सदस्या हिंदोळा उपस्थित होत्या. 

उपाययोजनांवर चर्चा 
खारबाची वाडीवर टॅंकर सुरू केल्यानंतर युवा प्रबोधिनी मंडळाच्या सदस्यांनी ग्रामस्थांना पाण्याचे महत्त्व समजावून सांगितले. पाणीटंचाईची ही समस्या कायमस्वरूपी कशी सोडवता येईल, याविषयी मार्गदर्शन केले. याविषयी सरपंच व सदस्यांशी चर्चा केली.