खालापूर तालुक्‍यात आढळले 21 कुष्ठरुग्ण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 ऑक्टोबर 2017

खालापूर (जि. रायगड) - तालुक्‍यात दोन टप्प्यात राबविण्यात आलेल्या कुष्ठरोग तपासणी मोहिमेत 21 रुग्ण सापडले आहेत. गेल्या वर्षीपेक्षा यंदा आठ रुग्ण कमी आढळले आहेत.

खालापूर तालुक्‍यात 38 हजार 827 घरांतील एक लाख 63 हजार 892 जणांची तपासणी केल्यानंतर 214 संशयित रुग्ण आढळून आले होते. पूर्ण तपासणीनंतर कुष्ठरोगाचे प्राथमिक अवस्थेतील 21 रुग्ण सापडले आहेत.

यामध्ये शहरी भागात केवळ तीन रुग्ण सापडले होते. झोपडपट्टी, आदिवासी वाडी, आश्रमशाळांच्या भागात 18 रुग्ण सापडले. यापैकी 16 जणांच्या रोगाचे स्वरूप असांसर्गिक; तर पाच जणांचे सांसर्गिक आहे. या रुग्णांवर तज्ज्ञ डॉक्‍टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.