कुटरेत आढळला मृतावस्थेत बिबट्या 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 नोव्हेंबर 2017

डॉक्‍टरांनी दिलेल्या शवविच्छेदन अहवालामध्येही अशीच नोंद करण्यात आली आहे. सुरवातीला बिबट्याची शिकार करण्यात आली का, अशी शंका निर्माण झाली होती.

चिपळूण : तालुक्‍यातील कुटरे येथे ग्रामस्थांना आज सकाळी मृतावस्थेत बिबट्या आढळून आला. त्याच्या शरीराच्या मागील बाजूला मार लागला होता. त्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

डॉक्‍टरांनी दिलेल्या शवविच्छेदन अहवालामध्येही अशीच नोंद करण्यात आली आहे. सुरवातीला बिबट्याची शिकार करण्यात आली का, अशी शंका निर्माण झाली होती. मात्र त्याची नखे, दात व कातडे आदी शाबूत असल्यामुळे शिकाऱ्यांनी त्याचा बळी घेतल्याचा संशय चुकीचा ठरला. 

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार कुटरे-असुर्डे रस्त्यावर दिनकरवाडीदरम्यान दुर्गंधी येत होती. शोध घेतल्यानंतर वाडीतील जांभा या ठिकाणी ग्रामस्थांना मृतावस्थेत बिबट्या आढळून आला. येथील ग्रामस्थांनी त्याची माहिती पोलिस पाटील यांना दिली.