रायगड: अंबा नदीच्या पुलावरुन पाणी; पुलावर राडारोडा, कचरा

अमित गवळे
बुधवार, 20 सप्टेंबर 2017

रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अंबा नदी पुलावरुन पाणी गेले.त्यामुळे पुलावर घाण व कचरा साठला अाहे. हा कचरा व राडारोडा काढण्याचे काम लगेच सुरु करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसअारडीसी) यांच्यामार्फत पुलावरील लोखंडी रेलिंगची अावश्यकती दुरुस्ती करण्यात येईल. तसेच खड्डे भरण्याचे काम देखिल करण्यात येणार आहे. यासाठी एमएसअारडीसीला सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल.
- संदिप चव्हाण, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग, पाली-सुधागड

पाली : मुसळधार पावसामुळे येथील अंबा नदी दुथडी भरुन वाहत अाहे. त्यामुळे मंगळवारी (ता.१९) मध्यरात्री नंतर वाकण-पाली मार्गावरील अंबा नदीच्या पुलावरून पाणी गेले. यामुळे पुलावर वाहून अालेल्या झाडाच्या फांद्या, काठ्या, प्लास्टिक व चिखलाचा राडारोडा साचला होता. यामुळे वाहण चालक अाणि पादचार्यांची गैरसोय झाली आहे.

हा पुल मुंबई-गोवा महामार्ग व मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला जोडतो. त्यामुळे येथून मोठ्या प्रमाणात प्रवासी व अवजड वाहनांची वाहतुक होते. या पुलावर ठिकठिकाणी खड्डे सुद्धा पडले आहेत. सुरवातीच्या पावसात या पुलाच्या मध्यावरील काही लोखंडी संरक्षक कठडे(रेलिंग) वाहून गेले आहेत. ते अजुनही बसविले गेलेले नाहीत. या लोखंडी रेलिंगला केबलची वायर देखिल गुंडाळली गेली आहे. कमकुवत लोखंडी कठडे, खड्डे, क्षमतेपेक्षा अधिक वाहणांची ये-जा, वारंवार पुलावर वाहून येवून साठलेला राडारोडा यामुळे वाहतुकीच्या दृष्टीने हा पुल अत्यंत धोकादायक झाला आहे. 

पुलावर साठलेल्या झाडांच्या फांद्या काठ्या, प्लास्टिक अाणि चिखलामुळे वाहनांचा वेग संथ होता. तसेच पादचार्यांना देखिल पुलावरुन वाट काढतांना अडथळा येत होता. त्यामुळे वेळिच या पुलाची दुरुस्ती करण्यात यावी. तसेच पुलावर संरक्षक कठडे बसविण्यात यावेत अाणि पुलावरील राडारोडा साफ करण्यात यावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे. पुलावरील कचरा व घाण ताबडतोब काढला जाईल अशी माहिती सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उपअभियंता संदिप चव्हाण यांनी सकाळला दिली.

रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अंबा नदी पुलावरुन पाणी गेले.त्यामुळे पुलावर घाण व कचरा साठला अाहे. हा कचरा व राडारोडा काढण्याचे काम लगेच सुरु करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसअारडीसी) यांच्यामार्फत पुलावरील लोखंडी रेलिंगची अावश्यकती दुरुस्ती करण्यात येईल. तसेच खड्डे भरण्याचे काम देखिल करण्यात येणार आहे. यासाठी एमएसअारडीसीला सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल.
- संदिप चव्हाण, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग, पाली-सुधागड

Web Title: Kokan news rain in raigad