संगमेश्वर: एसटी बस नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 नोव्हेंबर 2017

येडगेवाडीतून १७ विद्यार्थी कुंभारखाणी माध्यमिक विद्यामंदीर येथे जातात. मात्र एसटीने अचानक बसफेऱ्या रद्द केल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ लागले आहे.

संगमेश्वर : सलग तिसऱ्या दिवशी एसटी बस नसल्याने येडगेवाडीतील विद्यार्थ्यांना घरीच रहावे लागले. 

एसटी बसमुळे येडगेवाडीतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत अाहे. एसटीच्या हिटलरशाही कारभारावर पालकांनी बहिष्कार घातला आहे. एसटी अधिकारी जोपर्यंत हिटलरशाही पध्दतीत बदल करत नाहीत तोपर्यंत आपण आपल्या पाल्यांना शाळेतच पाठवणार नाही. एसटीच्या या अनागोंदी कारभारावर बहीष्कार टाकत आपली मुले शाळेत न पाठवण्याचा निर्णय येडगेवाडीतील पालकांनी घेतला आहे.

येडगेवाडीतून १७ विद्यार्थी कुंभारखाणी माध्यमिक विद्यामंदीर येथे जातात. मात्र एसटीने अचानक बसफेऱ्या रद्द केल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ लागले आहे.

टॅग्स