मुंबई गोवा महामार्गावर सुकेळी खिंडीत ट्रक दरीत कोसळला

अमित गवळे
गुरुवार, 5 ऑक्टोबर 2017

मुंबई गोवा महामार्गाचे अनेक वर्षांपासून संथ गतीने सुरु असलेले काम, रस्त्याच्या कडेला अालेले मोठे दगड अाणि माती, उतार व चढ, अरुंद अाणि खड्डेयुक्त रस्ता,अवजड वाहनांची रेलचेल, संरक्षक कठड्यांचा अभाव, वेगवान वाहने, दरड कोसळण्याची शक्यता यामुळे सुकेळी खिंडीतील मार्ग अत्यंत धोकादायक अाहे.यामुळे येथे वारंवार अपघात घडतात

पाली - मुंबई गोवा महामार्गावर सुकेळी खिंडीतील रस्ता अत्यंत धोकादायक आहे. सुकेळी खिंडीत बुधवारी (ता.४) रात्री दहाच्या सुमारास केमिकलचे ड्रम नेणारा ट्रक रस्त्याच्या बाजुच्या दरीत कोसळला. या अपघातात कोणीही जखमी झाले नाही.

चिपळूण तालुक्यातील लोटे एमअायडिसी मधून केमिकलचे ड्रम घेवून हा ट्रक पंजाबला चालला होता. घाट चढत असतांना ट्रकचा गिअर अडकल्याने ट्रक कोसळला. सुदैवाने ट्रकमध्ये असलेल्या ड्रायव्हर व क्लिनरला कोणतीही दुखापत झाली नाही. मुंबई गोवा महामार्गाचे अनेक वर्षांपासून संथ गतीने सुरु असलेले काम, रस्त्याच्या कडेला अालेले मोठे दगड अाणि माती, उतार व चढ, अरुंद अाणि खड्डेयुक्त रस्ता,अवजड वाहनांची रेलचेल, संरक्षक कठड्यांचा अभाव, वेगवान वाहने, दरड कोसळण्याची शक्यता यामुळे सुकेळी खिंडीतील मार्ग अत्यंत धोकादायक अाहे.यामुळे येथे वारंवार अपघात घडतात. 

सकाळने अनेक वर्षांपासून याबाबत माहिती देवून शासन प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.