रायगड: झाप गावात दोन गटात हाणामारी; 7 जखमी

अमित गवळे
शनिवार, 21 ऑक्टोबर 2017

यासंदर्भात भरत जंगम यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुरुवारी (ता.19) रात्री भरत जंगम हे जेवन करुन फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर आले होते. यावेळी राम बैकर व लक्ष्मण बैकर यांची आई मागील भांडणाचा राग मनात धरुन शिविगाळ करीत होती. यावेळी राम बैकर तेथे आले. 

पाली : सुधागड तालुक्यातील झाप गावात ऐंन लक्ष्मीपुजनाच्या दिवशी गुरुवारी (ता.१९) दोन गटात पुर्ववैमनस्यातून हाणामारी झाली. या हाणामारीत सात जण गंभीर जखमी झाले आहेत. पाली पोलीस स्थानकांत दोन्ही गटात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

याबाबत पाली पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी झाप येथील तक्रारदार लक्ष्मण बैकर हे रात्री साडे नऊच्या सुमारास मोटारसायकल वरुन पालीतीण झाप येथील घरी जात होते. यावेळी भरत जंगम, हितेश जंगम, गणेश जंगम, विनोद जंगम, निखिल जंगम, यांनी बैकर यांना रस्त्यात अडविले. मागील भांडणाचा राग मनात धरुन हाताबुक्क्याने मारहाण केली. निलेश जंगम याने रस्त्यालगतची पेरकुट घेवून मारहाण केली. तसेच दगड उचलून बैकर यांच्या कपाळावर मारला. तर विनोद जंगम याने नाकावर ठोशा मारुन बैकर यांच्या नाकाचा घुनघुना फोडला. या झटापटीत रस्त्यावर पडल्याने लक्ष्मण बैकर यांच्या डाव्या हाताला जखम झाली. यावेळी लक्ष्मण बैकर यांचा भाऊ राम बैकर भांडण सोडविण्याकरीता आला असता त्याला देखील विनोद जंगम, गणेश जंगम,भरत जंगम यांनी लादीचे तुकडे उचलून डोक्यात मारुन गंभीर दुखापत केली. भांडण सोडविण्याकरीता आलेल्या लक्ष्मण बैकर यांच्या आईला देखील धक्काबुक्की करुन शिविगाळ केली. या प्रकरणी पाली पोलीस स्थानकांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात भरत जंगम यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुरुवारी (ता.19) रात्री भरत जंगम हे जेवन करुन फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर आले होते. यावेळी राम बैकर व लक्ष्मण बैकर यांची आई मागील भांडणाचा राग मनात धरुन शिविगाळ करीत होती. यावेळी राम बैकर तेथे आले. दोघे एकमेकांची समजुत घालत असताना लक्ष्मण बैकर त्याचे जोडीदार सुशिल जंगम व प्रज्योत लहाने यांच्यासह आला. त्याने भरत जंगम यांस शिविगाळ करुन मारहाण करण्यास सुरवात केली.यावेळी भरत जंगम यांची आई, वडील, भाऊ, आत्या व आत्याचा मुलगा तेथे आले. लक्ष्मण बैकर व राम बैकर यांनी सुशिल जंगम व प्रज्योत लहाने यांच्या मदतीने त्यांना पकडून लाथाबुक्क्यांनी व पेरकुटीने मारहाण केली. तसेच लक्ष्मण बैकर याने भरत जंगम यांच्यावर दगड फेकून मारला त्यामुळे भरत जंगम यांच्या ओठाला दुखापत झाली. या भांडणात भरत जंगम यांची आत्या सुवर्णा व वडील गणेश यांच्या उजव्या हाताला व आतेभाऊ विनायक याच्या छातीला व उजव्या हाताला मुकामार लागला. तसेच भरत जंगम यांची आई निता जंगम यांच्या उजव्या कानाच्या बाजूला दगड लागून दुखापत झाली आहे. याबाबत पाली पोलीस स्थानकांत सबंधीतांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पुढिल तपास पाली पोलीस निरिक्षक दशरथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार पाटील करीत आहेत.