दापोली किनारपट्टीवर सीसीटीव्हीचा ‘वॉच’

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 ऑगस्ट 2017

दापोली - जिल्ह्यातील महत्त्वाच्या ठिकाणच्या सागरी किनाऱ्यावर आता चोवीस तास सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा ‘वॉच’ राहणार आहे. दापोली तालुक्‍यातील सागरी किनारी असलेल्या पोलिस चौक्‍यांवर व बंदर परिसर आता सीसी कॅमेऱ्यांच्या टप्प्यात आला आहे. किनारपट्टीच्या सुरक्षेसाठी हे महत्त्‍वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. दापोली, दाभोळ व हर्णै येथे हे सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्याचे काम बुधवारपासून (ता. २) सुरू करण्यात आले आहे.

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत या विषयावर काही महिन्यांपूर्वी चर्चा होऊन सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून आता कॅमेरे बसविण्याच्या कामाला सुरवात झाली. यामुळे सागरी ठाणे परिसरातील महत्वाच्या भागातील सुरक्षेवर व बंदाराकडे जाणाऱ्या मार्गावर सीसीटीव्हीच्या माध्यमातून नियंत्रण ठेवणे पोलिस यंत्रणेला सोपे होणार आहे. दापोली शहरात बुरोंडी नाका येथून बुरोडी, हर्णै बंदाराकडे जाणारे राज्य मार्ग आहेत. येथे सागरी पोलिस चौकी आहे. याच ठिकाणी दोन कॅमेरे बसविण्यात आले आहेत. हर्णै बंदर परिसरावर फिरते दोन कॅमेरे बसविण्यात आले आहेत.

दाभोळ बंदर धक्‍क्‍यावरही दोन फिरते कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे नियंत्रण संबंधित स्थानिक पोलिस ठाण्यातून ठेवेले जाणार आहे. हे सगळे कॅमेरे ऑनलाईन पद्धतीने जोडण्याचाही विचार सुरू असून नेट कनेक्‍टिव्हिटीच्या अडचणीमुळे सुरवातीस स्थानिक पोलिस चौकीतून नियंत्रण होणार आहे.

जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून घेण्यात आलेला हा महत्त्‍वपूर्ण निर्णय आहे. किनारपट्टीची सुरक्षा महत्त्‍वाची असून तेथील हालचालींवर सीसीटीव्हीतून नजर ठेवणे शक्‍य होणार आहे. 

Web Title: konkan news dapoli cctv