दापोलीत घरकुलासाठी २५० लाभार्थी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 जुलै 2017

दापोली - प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेअंतर्गत तालुक्‍यात २५० लाभार्थ्यांची निवड झाली. यापैकी  २३२ लाभार्थ्यांना ३० हजारांचा पहिला हप्ता दिला असून १०५ लाभार्थ्यांना दुसऱ्या हप्त्याचे ६० हजार रुपये थेट लाभार्थ्याच्या बॅंक खात्यात जमा केले आहेत. मंजूर २५० घरकुलांपैकी २० घरकुलांचे काम पूर्ण झाले आहे. त्यांना तिसरा हप्ता  देण्यात आला. 

या योजनेअंतर्गत लाभार्थ्याला १ लाख २० हजार, भारत स्वच्छता अभियानांतर्गत शौचालयासाठी १२ हजार, संपूर्ण ग्रामीण रोजगार योजनेंतर्गत १८ हजार, कामावर जॉब कार्डधारक म्हणून काम करणाऱ्या लाभार्थ्याला ९० मनुष्यदिन अशी रक्कम बॅंक खात्यामध्ये थेट जमा केली जाते. तालुक्‍यात पंतप्रधान आवास घरकुल योजनेअंतर्गत कोंढे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील गावांसाठी ३८, मांदिवली १३, इळणे १२, आंबवली बुद्रूक १०, असोंड १०, वांझळोली ९, मुरूड ९, जामगे ८, खेर्डी ८, पालगड ८, साखळोली ८, शिरसोली ७, टेटवली ७, कुडावळे ७, आसूद ६, विसापूर ६, करजगाव ५, कोळबांद्रे ५, गिम्हवणे ५, आडे ५, पाजपंढरी ५, टांगर ४, कवडौली ४, हर्णे ४, फणसू ४, आंजर्ले ४, उंबरशेत ३, भोपण ३, दमामे ३, डौली ३, माटवण ३, तेरेवायंगणी २, लाडघर २, आपटी २, चिखलगाव २, बोंडवली २, देहेण २, वीरसई २, तर शिवाजीनगर, नवानगर, ओणनवसे, वेळवी, उंबर्ले, दाभोळ आणि सडवे गावात प्रत्येकी एक घरकुल मंजूर झाले आहे. त्यातील बहुतांश कामे प्रगतिपथावर आहेत.