सरकार करतेय स्वराज्य संस्था खिळखिळ्या

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 जुलै 2017

मंडणगड - स्थानिक स्वराज्य संस्थांना पूर्णपणे खिळखिळे करून हे सरकार सत्तेचे केंद्रीकरण करू पहात आहे. चौदाव्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतीना भरघोस निधी मिळणार असल्याने गावांनी कोटींचे आराखडे तयार केले आहेत. मात्र या सरकारने तीन वर्षांत चार लाखांहून अधिक पैसे दिले नाहीत. ग्रामसभा, सरपंच, पंचायत समिती सदस्य यांचे अधिकार काढून घेतले. जिल्ह्यातील अनेक इमारतींच्या दुरुस्त्या रखडल्या आहेत. थेट सरपंचाच्या माध्यमातून ग्रामसभांचे अधिकार हिरावून सरपंचाना देण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी टीका भास्कर जाधव यांनी केली. 

शनिवारी भिंगळोली येथील श्रीकृष्ण सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा झाला, त्यावेळी ते बोलत होते. जाधव म्हणाले की, राष्ट्रवादीने लोकशाही घराघरात पोचवण्याचे काम केले. मात्र हे सरकार स्थानिक स्वराज्य संस्था खिळखिळ्या करीत आहे. ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर झाल्यानंतर तेथील कर्मचारी कायम करण्याचे धोरण राष्ट्रवादीचे आहे. मात्र येथे मुख्याधिकारीही नाहीत. जिल्ह्यात चार लाल दिवे असतानाही कुठलेही भरीव काम अद्याप झालेले नाही. स्वपक्षातील नेत्यांनाही त्यांनी कानपिचक्‍या दिल्या. ते म्हणाले की, लोकशाहीत निवडणुका जिंकायच्या असतील तर जनसमुदाय उभा करावा लागतो. पक्षांर्तगत कुरबुरी व गटबाजी करणाऱ्यांनाही त्यांनी सूचक सल्ला दिला. पुढाऱ्यांनी मानसीकता बदलली पाहिजे. मंडणगड नगरपंचायतीच्या माध्यमातून विकासाच्या योजना, कामे, संकल्प पूर्णत्वास नेण्यास सर्वोतोपरी मदत करीन. यावेळी नगराध्यक्षा प्रियांका शिगवण यांचा भव्य सत्कार करण्यात आला. म्हाप्रळ साळीवाडा येथील मनसेच्या कार्यकर्त्यांनी संतोष कुडेकर यांच्यानेतृत्वाखाली राष्ट्रवादीत प्रवेश केला. 

४ जुलैला शहीद झालेल्या राजेंद्र गुजर यांच्या अंत्यविधीला रामदास कदम उपस्थित राहिले नाहीत. एवढे दिवस उलटल्यांतरही कुटुंबाच्या सांत्वनासाठी त्यांना अजूनही वेळ मिळाला नाही ही दुदैवाची गोष्ट आहे. शहीद व शेतकरी आत्महत्यांची त्यांनी दखलही घेतली नाही, ही लाजिरवाणी गोष्ट आहे, अशी टीका आमदार संजय कदम यांनी केली. 

विधानसभेत तारांकित प्रश्‍न
मंडणगड ग्रामपंचायतीमधून नगरपंचायतीच्या सेवेत समाविष्ट झालेल्या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करून घेत नसल्याने निर्माण झालेले प्रश्‍न विधानसभेत तारांकित प्रश्‍नाद्वारे उपस्थित करुन मुख्यामंत्र्याशी चर्चा करणार असे आश्वासन जाधवांंनी दिले.

कोकण

पाली : मुसळधार पावसामुळे येथील अंबा नदी दुथडी भरुन वाहत अाहे. त्यामुळे मंगळवारी (ता.१९) मध्यरात्री नंतर वाकण-...

बुधवार, 20 सप्टेंबर 2017

रत्नागिरी -  कोणत्याही ऋतुत निसर्गरम्य कोकणात केलेली भटकंती नेहमीच लक्षात राहणारी आहे. गेले दोन दिवस पडणाऱ्या पावसाने...

बुधवार, 20 सप्टेंबर 2017

सावंतवाडी - आंबोली धबधब्यापासुन मिळणारे उत्पन्न पारपोली ग्रामपंचायतीला देण्यावर वनविभागाने शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे...

बुधवार, 20 सप्टेंबर 2017