राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत अादिती पाटील अव्वल

award
award

पाली - उर्जा संरक्षण राष्ट्रीय अभियान २०१७ अंतर्गत राज्यस्तरीय़ चित्रकला स्पर्धेत सीकेटी विदयालय नवीन पनवेलची अादिती प्रकाश पाटील सर्वप्रथम अाली आहे. तिच्या या चित्राची निवड राष्ट्रीय पातळीवर झाली अाहे. दिल्ली येथे होणार्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनीधीत्व करणार आहे.

उर्जा व संरक्षण राष्ट्रीय अभियान अंतर्गत चित्रकला स्पर्धेचे अायोजन शालेय, राज्यस्तरीय अाणि राष्ट्रिय स्तरावर करण्यात येते. मुंबईतील एस.एन.डि.टी काॅलेजमध्ये मंगळवारी (ता.१४) बालदिनी या राज्यस्तरीय स्पर्धेचे अायोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत अदितीने प्रथम क्रमांक पटकवला. अादितीला रोख रक्कम वीस हजार, प्रमाणपत्र व भेटवस्तू देवून सन्मानित करण्यात आले. अादिती नवीन पनवेल येथील सीकेटी विद्यालयात इयत्ता नववीत शिकत आहे. या स्पर्धेसाठी भारतातील नामवंत चित्रकार व कला तज्ञ परिक्षक होते. त्यामध्ये जे.जे. स्कुल अाॅफ अार्टचे माजी अधिष्ठाता जी. जी. वाघमारे,प्रतिष्ठित चित्रकार प्रमोद कुर्लेकर हे होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहूणे म्हणून अायएएस अधिकारी संजीव कुमार, के. रविंद्रन, एस.एन.डि.टी महाविदयालयाच्या प्राचार्या डाॅ. शशिकला वंजारी हे उपस्थित होते.

अादितीचे वडील प्रकाश पाटील हे अांतराष्ट्रीय दर्जाचे चित्रकार आहेत. भारतासह परदेशात त्यांनी काढलेल्या चित्रांचे प्रदर्शन भरते.त्यामूळे अादितीला चित्रकलेचे बाळकडू तिच्या वडिलांकडूनचे मिळले आहे. अादितीच्या या उल्लेखनीय यशामध्ये तीचे वडील प्रकाश पाटील, अाई तसेच तिच्या शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांचा मोलाचा वाट आहे. सर्व स्तरातून अादितीच्या या यशाचे कौतूक होत आहे.

लाखो स्पर्धकांमधून ठरली अव्वल

उर्जा संरक्षण राष्ट्रीय अभियान २०१७ अंतर्गत चित्रकला स्पर्धेचे अायोजन संपुर्ण भारतभर शालेय स्तरावर केले गेले. राज्यातील लाखो दिग्गज स्पर्धकांनी यामध्ये सहभाग घेतला होता. या शाळांमधून अालेल्या सर्वोतृष्ठ पन्नास चित्रांची निवड अंतिम राज्यस्तरीय स्पर्धेसाठी करण्यात आली. या पन्नास चित्रांमधून अादितीच्या चित्राला राज्यस्तरावर प्रथम पारितोषिक मिळाले.अादितीच्या या चित्राची निवड राष्ट्रीय स्तरावर झाली अाहे. दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे ती प्रतिनीधीत्व करणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com