कोकण-घाटमाथा जोडणारा ‘अणुस्कुरा’ दुर्लक्षित

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 ऑगस्ट 2017

राजापूर -  कोकण आणि घाटमाथा यांना जोडणाऱ्या अणुस्कुरा घाटाला विशेष महत्त्व आहे. तालुक्‍याचा पूर्व भाग असलेला पाचल परिसर कुशीमध्ये घेणारा अणुस्कुरा घाट विविधततेने नटलेला आहे. सध्या निसर्गसौंदर्याने न्हाऊन निघाला आहे. येथील निसर्गसौंदर्य पर्यटकांना लुभावत आहे. घाटातील नागमोडी वळणांच्या रस्त्यावरून प्रवास करताना अवखळपणे उंचावरून कोसळणारे धबधबे, दुर्मिळ वन्यजीवांचा वावर आणि पायथ्याच्या वस्तीमुळे पर्यटकांसाठी हे उत्तम ठिकाण बनू शकते. 

गेल्या अनेक वर्षांपासून कोकण आणि घाटमाथा यांचे विविध माध्यमातून अनोखे नातेसंबंध राहिले आहेत. दळणवळणाच्या दृष्टीने या घाटमाथ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. घाटातील सुळक्‍यासारखे पंधरा-वीस फुटांपेक्षा उंचच उंच गेलेले मोठे दगड जणू काही आकाशाला भिडल्याचाच भास होतो. संपूर्ण घाटाने सध्या हिरवीगार शाल पांघरल्यासारखे वाटते. अनेक ठिकाणी छोट्या-छोट्या स्वरूपामध्ये शंभरहून अधिक धबधबे स्वच्छंदपणे कमी-अधिक उंचीवरून अवखळपणे कोसळत आहेत. या धबधब्यांखाली बसून मनसोक्तपणे स्नान करणे शक्‍य नाही; मात्र या धबधब्यांचे उडणारे तुषार रस्त्यातून ये-जा करीत अंगावर झेलताना वेगळा आनंद मिळतो. घाटाच्या पायथ्याशी वसलेल्या अर्जुना मध्यम प्रकल्प, जामदा प्रकल्प आणि घाटाच्या पायथ्याशी वसलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसन वसाहतीमुळे या परिसराला आगळे रूप प्राप्त झाले आहे.

Web Title: konkan news rajapur