कोकण रेल्वेही हाऊसफुल्ल; वेळापत्रक कोलमडले

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 सप्टेंबर 2016

खेड- मुंबई-गोवा महामार्गावर गणेशोत्सावामुळे वाहनांची गर्दी झाली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या नित्याच्या गाड्यांसह गणपती स्पेशल गाड्यांच्या कोलमडलेल्या वेळापत्रकामुळे गणेशभक्तांच्या मार्गात विघ्न आले आहे. महामार्गावर खड्ड्यांमुळे रस्त्याची चाळण झाली आहे. 

कोकण रेल्वेमार्गावर नेहमीच्या गाड्यांसह जादा गणपती स्पेशल गाड्यांच्या विस्कळित वेळापत्रकामुळे प्रवाशांच्या हालात आणखी भर पडली. तरीही चाकरमान्यांनी रेल्वेलाच पसंती दिली आहे. पनवेल-चिपळूण डेमू गाडीही हाऊसफुल्ल धावत आहे. तरीही मुंबई, पुणे या ठिकाणाहून खासगी गाड्यासह एसटीच्या गाड्याही भरून येत आहेत. त्यामुळे शनिवारी रात्रीपासून महामार्ग फुल्ल झाला आहे. आज दिवसभरात अनेक वेळा महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली. त्यामुळे चाकरमान्यांचे हाल झाले. मुंबईतून काल रात्री 11 वाजता सुटलेली खासगी आरामबस आज दुपारी साडेचार वाजता रत्नागिरीत पोहोचली. महामार्गावर प्रचंड ट्रॅफिक असल्याचे बसच्या चालकाने सांगितले.

मदत केंद्राशी संपर्क साधावा
महामार्गावर गेले दोन दिवस मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ आहे. तरी आपल्या हद्दीत कोठेही मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झालेली नाही. आज सकाळी पहाटे साडेपाचच्या मुंबईहून कोकणात येणारी एसटी बस कशेडी घाटादरम्यान बंद पडली होती. वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक अशोक जाधव यांनी तत्काळ येथील एसटी अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्या प्रवाशांना दुसऱ्या एसटीची सुविधा उपलब्ध करून दिली. एखादा अपघात झाल्यानंतर वाहनचालकांनी तत्काळ पोलिस प्रशासन, रुग्णालय, मदत केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक अशोक जाधव यांनी केले आहे.