कुडाळात तरुण व्यावसायिकाची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 16 जुलै 2017

कुडाळ - कर्जाला कंटाळून येथील तरुण व्यावसायिकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. रवींद्र सखाराम दळवी (वय ३३) असे त्याचे नाव आहे. नक्षत्र टॉवरमधील ‘ई पेठ’ या आपल्या दुकानात त्यांनी जीवनयात्रा संपविली. हा प्रकार आज सकाळी उघड झाला.

रवींद्र मूळचे राधानगरी (जि. कोल्हापूर) येथील होते. अनेक वर्षांपासून ते कुडाळ येथे राहत होते. सर्वांशी त्यांचे मित्रत्वाचे नाते होते. संघर्षमय प्रवास करून त्यांनी व्यवसाय सुरू केला. संगणक क्षेत्रात हुशार म्हणून ते परिचित होते. ते शहरातील शिवाजीनगर येथे संगणकविषयी विविध अभ्यासक्रम चालवायचे. त्याबरोबरच त्यांनी काही महिन्यांपूर्वी शहरातील नक्षत्र टॉवरमध्ये एका गाळ्यात ई पेठ हे दुकान सुरू केले. यात ऑनलाईन खरेदी-विक्री, स्टेशनरी, संगणकविषयी विविध ऑनलाईन सेवा मिळत होत्या. यातून पाच-सहा जणांना रोजगारही उपलब्ध झाला होता.

रवींद्र पत्नी व दोन मुलांसह शहरातील रामेश्‍वर प्लाझामध्ये राहायचे. काल (ता. १४) रात्री त्यांच्या घरी पाहुणे आले होते.