काजू उत्पादन भरपूर; तरीही बागायतदार तोट्यातच

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 एप्रिल 2017

बहुसंख्य बी जाते बाहेर - प्रक्रिया उद्योग नसल्याने फटका; दरही ११० पर्यंत घसरला

मंडणगड - यावर्षी काजूचे तालुक्‍यात विक्रमी उत्पादन झाल्याचे शहरातून बाहेर जाणाऱ्या निर्यातीवरून स्पष्ट झाले आहे. शहरात ठिकठिकाणी फेरीवाल्या भैयांची सुकी बी गोळा करण्याची केंद्रे आहेत. या केंद्रांतून दररोज सायंकाळी किमान वीस टन गाडीचा लोड दररोज बाहेरगावी जाते. विक्रमी उत्पादनानंतरही दर घसरल्याने स्थानिकांना त्याचा फारसा फायदा होत नाही. स्थानिक पातळीवर प्रक्रिया उद्योग नसल्याने बीला उठाव नाही.

त्यामुळे तालुक्‍यातील बहुतांश बी बाहेर जात असल्याने नुकसान होते.
यावर्षी बाजारातील चढ-उतारांमुळे सुरवातीला चढा असलेला, तर अचानक कोसळल्याने व्यापाऱ्यांना फटका बसला आहे. पहिल्या टप्प्यात १६० ते १७० रुपये किलोने सुरू झालेली खरेदी तीन आठवड्यातच ११० रुपयांवर आली. व्यापाऱ्यांनी दर अचानक उतरवल्याने दुसऱ्या टप्प्यात काजू उत्पादक शेतकरी अडचणीत सापडण्याची शक्‍यता आहे. शेतकरीही हवालदिल झाले आहेत. बाजार अभ्यासकांच्या मते हे दर आणखीही घसरण्याची शक्‍यता आहे. 

तालुक्‍यातील नव्वद टक्‍क्‍यांहून अधिक लागवड गावठी काजू सदरातील आहे. वेंगुर्ला सहा अथवा सातची लागवड अत्यल्प आहे. गतवर्षीपेक्षा यंदा वाढलेले काजूचे उत्पादन, नोटाबंदीमुळे व्यापाऱ्यांकडे रोख पैशाचा अभाव आदी कारणांमुळे शेतकरी आणि बागायतदार अडचणीत आला आहे. याचा परिणाम म्हणून काजू बियांचा दर ऐन हंगामात अनपेक्षितपणे ११० रुपयांवर घसरल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. कोकणात काजू उत्पादक शेतकरी, व्यापारी, प्रक्रिया उद्योगांतील समन्वयाचा अभाव यावर्षीही कायम राहिल्याचा परिणाम काजू उद्योगावर होत असल्याचे गंभीर चित्र निर्माण होत आहे.

गतवर्षीपेक्षा यावर्षी काजूचे उत्पादन अधिक झाले. कोकणपट्टयात पहिल्या मोहोरातील काजू उत्तम आला; मात्र दुसऱ्या टप्प्यातील काजूला बदलत्या हवामानाचा फटका बसून मोहोर काळा पडला. उष्ण हवामानामुळे काजू लवकर तयार झाला आणि काजू बी एकदम बाजारात आली. मोठ्या प्रमाणावर सडून चाललेल्या काजू बोंडाचा तालुक्‍यात काहीच वापर होत नसल्याने ती रानात अक्षरशः सडून जात आहेत. उत्पादन व खर्चाचा मेळ बसत नसल्याने काजू प्रक्रिया उद्योग बंद पडत आहेत. त्यामुळे यंदा काजू बी अधिक येऊनही स्थानिक पातळीवर प्रक्रिया उद्योग नसल्याने बी ला उठाव नाही. त्यामुळे तालुक्‍यातील बहुतांश बी बाहेर जात आहे.

मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी निश्‍चितच काजूला सुरवातीला दर चांगला मिळाला. त्यामुळे शेतकरी आनंदित होते. खरेदीवाल्यांची क्षमता संपली असल्याने दर कमी मिळत आहे. शेतकऱ्याला आता मिळणारा दर कमी वाटत असेल, तर त्यांनी स्वतंत्रपणे प्रक्रिया करून काजू विक्री करावी.
- संजय रेवाळे, बागायतदार शेतकरी

Web Title: a lot of nuts production; still producer in loss