रायगडावर आज 'शिवराज्याभिषेक'

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 जून 2017

महोत्सव समिती, जिल्हा प्रशासनाकडून तयारी पूर्ण
महाड - अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे रायगडावर 6 जूनला साजरा होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडावर जय्यत तयारी करण्यात आली आहे. राज्यातील विविध भागांतून हजारो शिवभक्त गडावर रवाना झाले आहेत. या सोहळ्याची सुरवात आज गडपूजनाने करण्यात आली.

कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा होतो. 6 जूनला सकाळी रायगडावरील नगारखान्यासमोर भगवा ध्वज उभारून सोहळ्याची सुरवात होणार आहे. यानंतर राज सदरेवर मुख्य राज्याभिषेक सोहळा होईल. राजपुरोहितांच्या मंत्रोच्चारात शिवरायांच्या उत्सव मूर्तीवर अभिषेक व मेघडंबरीतील पुतळ्यावर सुवर्णनाण्यांचा अभिषेक केला जाणार आहे. पुण्यातील रणवाद्य ढोल-ताशा पथक व सह्याद्री गर्जना ढोल-ताशा पथक, शिवतीर्थ प्रतिष्ठान ढोल-ताशा पथक, होळीच्या माळावर शिवकालीन युद्धकलेची प्रात्यक्षिके, पालखी सोहळा, शिवछत्रपतींच्या प्रतिमेची शोभायात्रा हे खास आकर्षण असणार आहे.

महोत्सव समिती आणि रायगड जिल्हा प्रशासनातर्फे तयारी करण्यात आली आहे.