माखजन-सरंदमार्गे तुरळ रस्त्याची दुरवस्था

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 जुलै 2016

देवरूख : संगमेश्‍वर तालुक्‍यातील माखजन-सरंदमार्गे तुरळकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. मुंबई-गोवा महामार्गाला जोडणारा हा महत्त्वाचा मार्गच खड्डेमय झाल्याने सध्या माखजन पंचक्रोशीतील जनतेला अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

माखजन-तुरळ रस्त्याचे तुरळ ते हरेकरवाडी असे डांबरीकरण करण्यात आले आहे. माखजनकडून 1 किमी अंतराचे डांबरीकरण रखडल्याने मोठे खड्डे पडले आहेत. माखजनहून आरवलीमार्गे तुरळ न जाता हरेकरवाडीमार्गे तुरळला गेल्यास तब्बल 10 किमी अंतर वाचते; मात्र सध्या या रस्त्याची अवस्था बिकट झाल्याने माखजनकरांना 10 किमीचा वळसा मारून तुरळ येथे जावे लागत आहे. रस्त्याच्या दुरवस्थेकडे लोकप्रतिनिधींसह बांधकाम विभागही दुर्लक्ष करीत असल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्‍त केली आहे. 

कोकण

राजापूर : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे श्रेय घेणारे होर्डिग्ज शिवसेनेने तालुक्‍यात ठिकठिकाणी लावले. त्यावर शिवसेनेने कर्जमाफीचे...

04.03 AM

रत्नागिरी : रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावर एसटी आणि खासगी मिनीबस यांच्यात झालेल्या अपघातामध्ये 17 प्रवासी जखमी झाले. त्यात मिनीबस...

12.33 AM

सावंतवाडी - चराठे वझरवाडीतील दहावीत शिकणाऱ्या शाळकरी मुलाने आईसोबत पैशांवरून भांडण झाल्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना...

शनिवार, 24 जून 2017