जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विकास चव्हाण यांची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 ऑगस्ट 2017

मंडणगड - रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख विकास केशव चव्हाण यांनी आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली. आत्महत्येपूर्वी त्यांनी परिस्थितीला कंटाळून आत्महत्या करीत आहे, अशी चिठ्ठी लिहून ठेवली होती.

मंडणगड गांधी चौक येथील स्मशानभूमीशेजारी असलेल्या विहिरीत आज सायंकाळी त्यांनी उडी मारुन आत्महत्या केली. त्यापूर्वी विहिरीच्या कठड्यावर त्यांनी त्यांची चप्पल, चष्मा, छत्री ठेवली. तसेच चिठ्ठी लिहून ठेवली होती. चव्हाण यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. पोलिस या संदर्भात अधिक तपास करीत आहेत. चव्हाण यांच्या आत्महत्येचे वृत्त शहरात वाऱ्यासारखे पसरले. या घटनेने शहरावर शोककळा पसरली. त्यांचे राजकीय अनुयायी व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी धाव घेतली. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांची प्रभारी म्हणून धुरा सांभाळणाऱ्या विकास चव्हाण यांनी शिवसेनेत अनेक संघटनात्मक पदे भूषविली होती. युवकांचे प्रेरणास्थान व तालुक्‍यातील सेनेची मुलूख मैदान तोफ असा लौकिक त्यांनी मिळवला होता.