देवकुंड धबधब्यावर पर्यटकांना बंदी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 जुलै 2017

माणगाव (जि. रायगड) - येथील देवकुंड धबधब्यात वाढलेल्या पाण्याच्या प्रवाहात बुडून लेफ्टनंट कर्नलचा मृत्यू झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर महसूल विभागाने देवकुंड धबधब्याच्या एक किलोमीटर परिसरात पर्यटकांना प्रवेशासाठी बंदी घातली आहे.

उपविभागीय अधिकारी बाळासाहेब तिडके यांनी बुधवारी हा आदेश काढला. नौदल व राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाने 26 तासांनंतर लेफ्टनंट कर्नलचे पार्थिव शोधले होते. त्याआधी काही दिवसांपूर्वी धबधब्याजवळ अडकलेल्या 55 विद्यार्थ्यांना वाचवण्यात आले होते. देवकुंड धबधब्यात रविवारी बुडालेल्या आणखी दोघांचा शोध सुरू करण्यात आला. या पार्श्‍वभूमीवर धबधब्याच्या परिसरात प्रवेश करण्यास बंदी घातली आहे.