पाली-खोपोली मार्गावर मोटारसायकल व टेम्पोचा अपघात

Khopoli-accident
Khopoli-accident

पाली : पाली-खोपोली मार्गावर परळी गावाजवळ रविवारी (ता. 10) रात्री 9 वाजून 40 मिनिटाच्या सुमारास मोटारसायकल व टेम्पो या दोन वाहनात अपघात झाला. या अपघातात तिघेजण जखमी झाले आहेत. पाली खोपोली मार्गावर बबन लक्ष्मण पवार (रा. खरवली ता. खालापूर) हे रविवारी मोटारसायकलवरुन परळीकडून पालीकडे दोघींना घेऊन येत होते. यावेळी टाटा एस. टेम्पोला त्यांची धडक बसली. हा टेम्पो पालीकडून खोपोलीकडे निघाला होता. 

टेम्पो परळी येथील कोकण किनारा हॉटेलकडे सिग्नल देऊन वळत असताना समोरुन येणार्‍या बबन पवार यांच्या मोटारसायकलची टेम्पोला धडक बसून अपघात झाला. या अपघातात बबन पवार, बेबी पवार, आश्विनी पवार हे तिघेजण जखमी झाले आहेत. जखमींना उपचाराकरिता जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग येथे दाखल करण्यात आले. पुढील तपास पाली पोलीस निरिक्षक दशरथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार एफ. बी. तडवी करीत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com