मुंबई गोवा महामार्गावर डंपरच्या केबीनला अाग, जिवितहानी नाही

अमित गवळे
शुक्रवार, 2 फेब्रुवारी 2018

पाली (रायगड) : मुंबई गोवा महामार्गावर माणगाव तालुक्यातील तळेगाव गावाजवळ गुरुवारी (ता. 1) सायंकाळी एका डंपरच्या केबिनला अाग लागली. यावेळी डंपरची केबिन अातून पुर्णतः जळाली. चालक व सुज्ञ नागरिकांच्या प्रसंगावधानेतेमुळे कोणतीही जिवितहानी झाली नाही.

मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याचे काम सध्या सुरु अाहे. यावेळी रस्त्यावर डंपरद्वारे माती भराव टाकण्याचे काम सुरु अाहे. यातील एक डंपर गुरुवारी (ता. 1) सायंकाळी येथून जात होता. त्यावेळी या चालत्या डंपरच्या गेअर बाॅक्सला अचानक अाग लागली. रस्त्याच्या कडेला शेतात क्रिकेट खेळत असलेल्या काही युवकांनी डंपरला अाग लागल्याचे पाहिले. त्यातील काही तरुण तत्पर डंपरच्या मागे अाले व केबिनला अाग लागल्याचे चालकाच्या निदर्शनास अाणून दिले. तळेगाव जवळील पेट्रोल पंपासमोर चालकाने ताबडतोब डंपर बाजुला घेवून थांबविला. चालक खाली उतरल्यानंतर केबिनची अाग अधिक भडकली. महामार्गाच्या कामासाठी जवळच असलेला पाण्याचा टँकर तेथे आला अाणि केबिनची अाग विझविण्यात आली. त्यामुळे कोणताच अनुचीत प्रकार घडला नाही. परंतू काही काळ महामार्गावर गर्दी झाली होती.

Web Title: Marathi news kokan news dumper fire