रक्तदान शिबिराला महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद

raigad
raigad

रसायनी ; (रायगड) रोटरी क्लब आँफ  पाताळगंगा, महात्मा एज्युकेशन सोसायटी पिल्लई एचओसी एज्युकेशन कँम्स रसायनी आणि अर्पण ब्लड बँक यांच्या वतीने पिल्लेज काँलेजच्या सभागृहात मंगळवार ( ता 16 ) रोजी रक्तदान शिबीर घेण्यात आले. या शिबीराला महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा उत्सफुर्त प्रतिसाद मिळाला.  

यावेळी उदघाटन प्रसंगी झालेल्या कार्यक्रमाला रोटरी क्लब आँफ  पाताळगंगाचे अध्यक्ष  दिपक चौधरी, माजी अध्यक्ष बाळकृष्ण होनावळे, सदस्य नागेश कदम, गणेश म्हात्रे, सुनिल भोसले, रमाकांत कोरडे, सुनिल कुरूप, गणेश वर्तक, पिल्लई काँलेज पाँलिटेकनिक विभागचे प्राचार्य अमर मंगे, इंजीनियर विभागचे डीन रमेश सुराटे  तसेच अर्पण ब्लड बँक संचालीका वर्षा उगांवकर आदि उपस्थित होते. 

यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाळकृष्ण होनावळे यांनी केले. डॉ मिंलीद भगत यांनी रक्तदानाचे महत्व पटवुन दिले. अर्पण ब्लड बँक भांडुप यांनी रक्ताचे संकलन केले, 205 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी रक्तदान केले. ब्लड बँकचे कर्मचारी, पिल्लई काँलेजाचे प्राचार्य अनवर पटेल यांनी आणि रोटरी क्लबच्या सदस्यांनी हे शिबीर यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com