मुरुड तालुक्‍यात वनविभागाचा छापा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 सप्टेंबर 2017

नांदगाव - मुरुड तालुक्‍यातील नांदगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीतील भवानी पाखाडीमधील एका बंगल्यावर छापा घालून मुरुड वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी साग व शिसवाच्या लाकडाचे 334 ओंडके, फर्निचर व त्याचे सुटे भाग असा 56 हजार 482 रुपयांचा माल जप्त केला. याप्रकरणी बंगल्यातील नोकराला गणेश गणपत ठोंबरे (39) याला वनविभागाने ताब्यात घेतले आहे.

हा बंगला मुंबईतील राजेश सुंदरलाल बहल यांच्या मालकीचा आहे. तेथे साग, शिसव व अन्य झाडांच्या लाकडांपासून फर्निचर व विविध वस्तू बनविल्या जातात, अशी माहिती मिळाली होती. त्यानुसार या बंगल्यावर छापा घातला. तेथे सापडलेला माल सुपेगाव येथील केंद्रात हलवला आहे. ठोंबरे याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. बंगल्याचे मालक राजेश बहल यांना नोटीस पाठवून वनविभाग खुलासा मागणार आहे.