कारिवडेतील कचरा प्रकल्पाला विरोध नको - केसरकर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 एप्रिल 2017

सावंतवाडी - कारिवडे येथे उभारण्यात येणाऱ्या पालिकेच्या कचरा प्रक्रिया प्रकल्पाचा त्रास परिसरातील लोकांना होणार नाही, तशा पद्धतीने त्याची बांधणी करण्यात येणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाला विरोध करू नये, असे आवाहन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी येथे केले. 

पर्यटनमंत्री श्री. रावल यांच्या दौऱ्यानिमित्त श्री. केसरकर यांनी या वेळी आपले मत मांडले. या वेळी नगराध्यक्ष बबन साळगावकर, उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर, तसेच मुख्याधिकारी विजयकुमार व्दासे आदी उपस्थित होते. 

या वेळी श्री. केसरकर म्हणाले, ‘‘शहराचा सर्वांगीण विकास होणे गरजेचे आहे. या पार्श्‍वभूमीवर सावंतवाडी शहराला मुख्यमंत्र्यांनी वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून पाच कोटी रुपयांचा निधी दिला आहे. या निधीचा उपयोग शहरातील रस्ते, फूटपाथ तसेच अन्य पर्यटनपूरक गोष्टींसाठी केला जाणार आहे. तसेच भविष्यात पर्यटकांना शहराकडे वळविण्यासाठी आवश्‍यक असलेले पर्यटन प्रकल्प सुरू करण्यात येणार आहेत.

कारिवडे येथे उभारण्यात येणाऱ्या कचरा प्रक्रिया प्रकल्पाला काही स्थानिक लोकांकडून विरोध केला जात आहे; मात्र हा विरोध पूर्णत: चुकीचा आहे. या प्रकल्पाची बांधणी योग्य पद्धतीने होणार आहे. तसेच त्या ठिकाणी कचरा नेऊन टाकला जाणार नाही, तर त्या ठिकाणी त्यावर प्रक्रिया केली 
जाणार आहे. 

वेंगुर्ले पालिकेतर्फे अशाच प्रकारचा प्रकल्प राबविण्यात आला आहे; मात्र त्याला कोणाचाही विरोध झालेला नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे केवळ विरोधासाठी विरोध न करता त्या ठिकाणी प्रकल्प यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. शहरातील पर्यटनदृष्ट्या विकसित केलेले प्रकल्प बंद अवस्थेत आहेत. त्यांचे भाडे गलेलठ्ठ असल्यामुळे ते प्रकल्प चालविणे सर्वसामान्य लोकांना शक्‍य झालेले नाही. परिणामी त्यांची उत्तरे पालिका पदाधिकाऱ्यांना द्यावी लागत आहेत. त्यामुळे हे प्रकल्प सुरू होण्यासाठी प्रयत्न व्हावेत.’

Web Title: no oppose in kariwade garbage depo