फटाक्‍यांच्या स्फोटात कर्मचाऱ्याचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 डिसेंबर 2016

नेरळ : नेरळ-कळंब रस्त्यावर धामोते गावाच्या हद्दीत "हॉटेल डिस्कव्हर'मध्ये बुधवारी रात्री झालेल्या फटाक्‍यांच्या स्फोटात इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या 19 वर्षीय कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. हळदीच्या कार्यक्रमात हे फटाके वाजवले जात होते.

या संदर्भात रितेश सुभाषचंद्र अग्रवाल यांनी दिलेल्या तक्रारीनुसार नेरळ पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. नेरळ गावातील व्यापारी सिसोदिया यांच्या मुलाच्या लग्नाचा हळदी समारंभ हा हॉटेलमध्ये होता.

वधू-वराच्या स्वागताच्या वेळी कोल्ड फायर फटाक्‍यांची आतषबाजी सुरू असताना स्टेजवरील फटाक्‍यांचा एक लोखंडी बेस बॉक्‍स उडाला. त्यामुळे वैभव मिसाल याच्या छातीला गंभीर दुखापत झाली. त्याला प्रथम नेरळ रस्त्यावरील साई रुग्णालयात नेण्यात आले. तेथून कर्जत रस्त्यावरील रायगड रुग्णालयात नेत असताना त्याचा मृत्यू ओढवला. तो पुणे येथील एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीचा कर्मचारी आहे. हॉटेल व्यवस्थापनाने या कंपनीला कार्यक्रमाच्या व्यवस्थेची जबाबदारी दिली होती.

कोकण

महाड - कोकणात गणेशोत्सवासाठी येणा-या गणेश भक्तांपुढे कोणतेही विघ्न येऊ नये यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. महामार्गावर...

05.21 PM

सावंतवाडी : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना मंत्रीपद मिळालेच पाहिजे. आता पुन्हा जिल्ह्याला चांगले दिवस येणार असा विश्वास...

02.06 PM

गोवा विद्यापीठाचे संशोधन - पर्यटनाला वेगळी ओळख देण्याची ताकद सावंतवाडी -...

08.57 AM