सुधागड तालुक्यात युवकाची गळफास लावून आत्महत्या

suicide
suicide

पाली- सुधागड तालुक्यातील नाडसुर गावातील एका युवकाने सोमवारी (ता.११) रात्री गळफास लावून आत्महत्या केली. विश्वास विजय वारंगे (वय १८) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. त्याच्या आत्महत्येचे कारण काय असावे हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

या प्रकरणी प्रमोद प्रकाश अहिरे रा. वरसे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पाली पोलीस स्थानकांत अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. याबाबत पाली पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार नाडसुर येथील विश्वास विजय वारंगे हा युवक घरात कुणालाही काहीही न सांगता निघून गेला होता. या तरुणाचा शोध घेतला असता सोमवारी  (ता. ११) नाडसूर गावचे हद्दीत गावलुसे दांड नावाचे माळराणावर एका सायडोलीच्या झाडावर सिमेंटच्या पिशवीच्या दोरीच्या सहाय्याने गळफास लावलेला त्याचा मृतदेह आढळला. याबाबत पोलिस निरिक्षक दशरथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक ए.आर.शिर्के तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com