जैतापूरला विरोधासाठी आमचा वापर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 फेब्रुवारी 2017

रत्नागिरी - अनेक वर्षे शिवसेनेची सत्ता असूनही कोणतीही विकासकामे झाली नाहीत. ग्रामस्थांना भडकवून जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध करण्यासाठी वापर करून घेतला. त्यांनी केवळ धूळफेक केली. ज्यांनी भडकावले त्यांची प्रकल्पात ठेकेदारी सुरू आहे. यामुळे आता फक्त विकासाच्या मुद्द्यावरच आम्ही सारेजण भाजपमध्ये प्रवेश करीत आहोत, असे राजापूर तालुक्‍यातील अणसुरे, सागवे येथील शेकडो कार्यकर्त्यांनी सांगितले.

रत्नागिरी - अनेक वर्षे शिवसेनेची सत्ता असूनही कोणतीही विकासकामे झाली नाहीत. ग्रामस्थांना भडकवून जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध करण्यासाठी वापर करून घेतला. त्यांनी केवळ धूळफेक केली. ज्यांनी भडकावले त्यांची प्रकल्पात ठेकेदारी सुरू आहे. यामुळे आता फक्त विकासाच्या मुद्द्यावरच आम्ही सारेजण भाजपमध्ये प्रवेश करीत आहोत, असे राजापूर तालुक्‍यातील अणसुरे, सागवे येथील शेकडो कार्यकर्त्यांनी सांगितले.

या कार्यकर्त्यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळ माने यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. माने यांच्या निवासस्थानी काल (ता. ३१) झालेल्या या कार्यक्रमास बाळ माने, विसुभाऊ पटवर्धन, भाजपचे निरीक्षक वासुदेव तुळसणकर, राजापूर तालुकाध्यक्ष अनिल करंगुटकर, मुख्य निरीक्षक संदेश कुलकर्णी, सभेचे अध्यक्ष कृष्णाजी मयेकर, दिवाकर आडिवरेकर आदी उपस्थित होते. या वेळी बाबू अवसरे व रूपाली शिर्सेकर यांना पंचायत समितीसाठी व सौ. अक्षता अभिमन्यू आंबोळकर यांना जिल्हा परिषदेसाठी तिकीट मिळाले.

विसुभाऊ पटवर्धन यांनी मनोगतामध्ये विकासकामांसाठी भाजपमध्ये प्रवेश करीत असल्याचे सांगून शंभर टक्के परिवर्तन होणार आणि सर्व ग्रामस्थ एकत्र आहोत, असे ठामपणे सांगितले. 

सेना, काँग्रेसशिवाय आता भाजप हा राष्ट्रीय पक्ष तिसरा सक्षम पर्याय उपलब्ध झाला आहे. केंद्र, राज्याप्रमाणे ग्रामपंचायतीपर्यंत शतप्रतिशत भाजपची सत्ता स्थापन करण्यासाठी सज्ज आहोत, असे कुलकर्णी यांनी सांगितले. बाळ माने यांनी सांगितले की, प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांचे दुकान आता बंद होणार आहे. ग्रामस्थांना फायदा कशात आहे ते कळले आहे. प्रकल्पग्रस्तांचे दाखले, बागायती नुकसान, सुधारित करार, अंजनेश्‍वर देवस्थान, रुग्णालय, आयटीआय आदी विविध प्रश्‍नांवर ग्रामस्थ व मुख्यमंत्र्यांची भेट घडवून आणणार आहे. प्रकल्पग्रस्तांना नक्कीच न्याय मिळेल.

या वेळी युवासेना उपतालुकाधिकारी अमित नार्वेकर, शाखाधिकारी सुदेश नार्वेकर, अभिषेक बहिरे, मनोज मोर्ये, राकेश आराबेकर, गणेश बहिरे, संतोष गावकर, चंद्रशेखर नार्वेकर, महेश नार्वेकर, सुभाष गावकर, संजय गावकर, नीलेश आडिवरेकर, राजू कांबळी, सुनील बावकर, अजित बर्गे, वैभव बावकर, विशाखा आंबोळकर, शेवंती रुमडे, राहुल आंबोळकर, श्रीधर आंबोळकर, विजया पाटील, श्रेया रुमडे, गीता गोलतकर, तुळशीदास जोशी, महादेव जोशी, दिलीप पारकर आदींसह २५० कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

कोकण

सावंतवाडी - नारायण राणेंचा भाजप प्रवेश म्हणजे चित्रपटाच्या वेगवेगळ्या जाहिराती आहेत. त्यांच्याविषयी न बोललेलेच बरे; मात्र...

03.48 AM

सावंतवाडी - गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर आज (बुधवार) सकाळी सोशल मिडीयावरून पसरविण्यात येणाऱ्या अंबोली घाटाबद्दलच्या अफवा...

बुधवार, 23 ऑगस्ट 2017

खरेदीसाठी मोठी गर्दी - फळबाजार तेजीत; हॉटेल फुल्ल कणकवली - गणरायांच्या आगमनासाठी अवघ्या दोन दिवसांचा कालावधी शिल्लक...

बुधवार, 23 ऑगस्ट 2017