गोवंश कत्तलप्रकरणी आरोपी अटकेत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 ऑक्टोबर 2017

पाली (जि. रायगड) - सुधागड तालुक्‍यातील शरदवाडी गावाच्या हद्दीत 6 ऑगस्टला दोन बैल व एका खोंडाची मांसासाठी कत्तल झाली होती. या गुन्ह्यातील चौथ्या आरोपीला पाली पोलिसांनी अटक केली आहे.

पाली (जि. रायगड) - सुधागड तालुक्‍यातील शरदवाडी गावाच्या हद्दीत 6 ऑगस्टला दोन बैल व एका खोंडाची मांसासाठी कत्तल झाली होती. या गुन्ह्यातील चौथ्या आरोपीला पाली पोलिसांनी अटक केली आहे.

मांस खरेदी करणारा नबी अहम्मद तुफेल अहमद खुरेशी (निजामपुरा, भिवंडी) यास पाली पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणातील आरोपी महम्मद रमजान ऊर्फ फिरोज अंगा रफिक शेख (22, गोविंदवाडी, कल्याण), फिरोज ऊर्फ आवली अकबर सय्यद (23, गोविंदवाडी), इंतजार अली ऊर्फ मुल्ला मुदीअली शेख (32, सिबलीनगर, मुंब्रा, मूळ. उत्तर प्रदेश) यांना पाली पोलिसांनी आधीच अटक करून त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली मोटार जप्त केली आहे.