सुकेळी खिंडीत मालमोटार कोसळली

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 ऑक्टोबर 2017

पाली - मुंबई-गोवा महामार्गावर सुकेळी खिंडीत बुधवारी (ता. 4) रात्री रसायने वाहून नेणारी मालमोटार रस्त्यालगतच्या दरीत कोसळली. या अपघातात कोणीही जखमी झाले नाही.

पाली - मुंबई-गोवा महामार्गावर सुकेळी खिंडीत बुधवारी (ता. 4) रात्री रसायने वाहून नेणारी मालमोटार रस्त्यालगतच्या दरीत कोसळली. या अपघातात कोणीही जखमी झाले नाही.

चिपळूण तालुक्‍यातील लोटे एमआयडीसीमधून निघालेली ही मालमोटार पंजाबला जात होती. घाट चढत असताना मालमोटारीचा गिअर अडकल्याने ती दरीत कोसळली. यातून चालक व क्‍लीनर सुखरूप बचावले. महामार्गाचे काम अनेक वर्षांपासून संथ गतीने सुरू आहे. रस्त्याच्या कडेला आलेले मोठे दगड आणि माती, अरुंद आणि खड्डेयुक्त रस्ता, संरक्षक कठड्यांचा अभाव, दरडी कोसळण्याची शक्‍यता यामुळे सुकेळी खिंडीतील मार्ग अत्यंत धोकादायक बनला आहे.