भोगावतीच्या पुरातून एकाला वाचवले

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 सप्टेंबर 2017

पेण - तालुक्‍यातील भोगावती नदीला आलेल्या पुराच्या प्रवाहात अडकलेल्या एका व्यक्तीला वाचवण्यात आले आहे.

पेण - तालुक्‍यातील भोगावती नदीला आलेल्या पुराच्या प्रवाहात अडकलेल्या एका व्यक्तीला वाचवण्यात आले आहे.

मुसळधार पावसाने पेण शहरासह संपूर्ण तालुक्‍यात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. भोगावती, बाळगंगा, निगडे, अंबा या नद्या धोक्‍याच्या पातळीवर वाहत होत्या. मांगरुळ गावातील शेतमजूर धर्मा पांडू भस्मा (वय 55) हे भोगावती नदीच्या वाढत्या प्रवाहामुळे नदीपलीकडे अडकून पडले होते. याची माहिती बुधवारी सकाळी मिळताच पेणचे तहसीलदार आणि पोलिस पथकाने तिकडे धाव घेतली. धर्मा यांस दोरखंडाच्या साह्याने पुरातून सुखरूप बाहेर काढण्यात आले.