राजपथ संचलनासाठी स्नेहल, शिप मॉडेलिंगसाठी देवेंद्रची निवड

राजपथ संचलनासाठी स्नेहल, शिप मॉडेलिंगसाठी देवेंद्रची निवड

रत्नागिरी - नवी दिल्ली येथे प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील एनसीसीच्या दोन छात्रांची निवड झाली. राजपथ संचलनासाठी पीओ कॅडेट स्नेहल कनावजे आणि शिप मॉडेलिंगसाठी पीओ कॅडेट देवेंद्र खवळे याची निवड झाली. कठोर मेहनतीमुळे या एनसीसी छात्रांना संधी मिळाली आहे. प्रतिवर्षाप्रमाणे गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाची परंपरा देवेंद्र खवळे (द्वितीय वर्ष कला) आणि स्नेहल कनावजे (द्वितीय वर्ष विज्ञान) यांनी कायम राखली आहे.

स्नेहलने हिने कोल्हापूर येथील प्रीआरडी व ३ आरडी निवड चाचणी कॅंप केले. नंतर औरंगाबादमध्ये पुढील कॅंपसाठी निवड झाली. तेथे इंटर ग्रुप कॉम्पिटिशन कॅंप व ४ कंबाईन ॲन्युअल ट्रेनिंग कॅंप झाले. दिल्ली येथे संपूर्ण भारतातील १७ एनसीसी डायरेक्‍टरेट छात्रांचे एकत्र ४ कॅंप आयोजित केले जातात. तेथे प्रत्येक राज्यातील ऑल इंडिया गार्ड, पीएम रॅली, राजपथ संचलन आणि बेस्ट कॅडेटसाठी स्पर्धा होतात.

देवेंद्र खवळेची शिप मॉडेलिंगसाठी निवड झाली. दिल्लीतील डीजी एनसीसीकडून ॲन्युअल जनरल इन्स्ट्रक्‍शननुसार त्याने कसून सराव केला. एनसीसी युनिट पातळीवर त्याने शिप मॉडेलचा तीन महिने सराव केला. औरंगाबादमध्ये ३ कंबाईन ॲन्युअल ट्रेनिंग कॅंप केले. त्याने सेलिंग मॉडेल या प्रकारात ‘विंड स्टार’ या शिप मॉडेलचे, व्हीव्हीआयपी मॉडेल प्रकारात ‘आयएनएस ब्रह्मपुत्रा’ या मॉडेलचा आणि पॉवरशिप मॉडेल प्रकारात ‘आयएनएस गंगा’ व ‘आयएनएस तारारिगी’ मॉडेलचा सराव केला आहे.

दिल्ली येथे भारतातील १७ राज्यांमधील ५१ शिप मॉडेलर्स छात्र सहभागी होणार आहेत. तेथे पॉवर मॉडेल प्रकारातील मॉडेल्सच्या चिठ्ठ्या टाकून त्यातील मॉडेल ७२ तासांत बनवण्याचे आव्हान असते. यातील विजेत्यांना पंतप्रधान रॅलीमध्ये सहभागी होण्याची संधी मिळते. देवेंद्र व स्नेहल यांना लेफ्टनंट अरुण यादव, दिलीप सरदेसाई, सीमा कदम, सेकंड महाराष्ट्र नेव्हल युनिटचे कमांडिंग ऑफिसर विध्येश उंदिरे, शिप मॉडेल इन्स्ट्रक्‍टर शशिकांत जाधव व अन्य कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले. या सर्वांचे अभिनंदन प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी केले.

कठोर दिनचर्या
राजपथ संचलनासाठी कठोर दिनचर्या असते. मध्यरात्री १.३० वाजता उठणे, २.३० वाजता एकत्र येणे व पहाटे ५ वाजता प्रत्यक्ष सरावाला सुरवात होते. राजपथावर होणाऱ्या संचलनात संपूर्ण भारतातून १४४ सीनियर डिव्हिजनचे कॅडेट (मुलगे) व १४४ सीनियर विंग (मुली) सहभागी होणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com