कृषी संशोधन समितीची 15 वाणांना मान्यता

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 मे 2018

समितीसमोर आलेल्या १६ वाणांपैकी १५ वाणांना समितीने मान्यता दिली. विविध कृषी अवजारांसंबंधात एकूण १२ अवजारांपैकी ११ अवजारांना समितीने शिफारशीत केले. 
विविध पिकांच्या लागवड संदर्भात डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या ५० शिफारशींचा, मंजूर शिफारशींमध्ये समावेश आहे.

दाभोळ - दापोलीतील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात गेले दोन दिवस सुरू असलेल्या ४६ व्या संयुक्‍त कृषी संशोधन आणि विकास समितीच्या बैठकीमध्ये राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या मिळून सादर केलेल्या एकूण १५१ शिफारशींपैकी १३१ शिफारशींना समितीने मंजुरी दिली.

समितीसमोर आलेल्या १६ वाणांपैकी १५ वाणांना समितीने मान्यता दिली. विविध कृषी अवजारांसंबंधात एकूण १२ अवजारांपैकी ११ अवजारांना समितीने शिफारशीत केले. 
विविध पिकांच्या लागवड संदर्भात डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या ५० शिफारशींचा, मंजूर शिफारशींमध्ये समावेश आहे.

कृषी अवजारांमध्ये डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या ‘केकेव्ही शंकु कोळपे’, महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या ‘फुले कैरी फोडणीयंत्र’, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ‘पंदेकृवि पेरणी व डवरणी यंत्र’, ‘पंदेकृवि पीक अवशेष स्लॅशर यंत्र’, ‘पंदेकृवि पावर कटर’, ‘पंदेकृवि कांदा प्रतवारी यंत्र’, ‘पंदेकृवि जांभूळ गर निष्कासन यंत्र’, तर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या ‘एक बैलचलित टोकण यंत्र’, ‘बैलचलित सरी यंत्रासहित तीन पासेचे कोळपे’, ‘ट्रॅक्‍टर रुंदसरी वरंबा टोकण यंत्र व तण नाशक फवारणी यंत्र’, ‘बैलचलित सौर ऊर्जेवर चालणारे तणनाशक फवारणी यंत्र’ या अवजारांचा समावेश आहे.

मान्यताप्राप्त विविध पिकांच्या वाणांमध्ये डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या ‘ट्रॉम्बे कर्जत कोलम (भात)’, ‘कोकण कॅशिया’ (दालचिनी), ‘कोकण संयुक्‍ता’ (जायफळ); महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या ‘फुले विक्रांत’ (हरभरा), ‘फुले चेतना’ (कापूस), ‘फुले प्राइड’ (केळी), ‘फुले विजया’ (पपया), ‘फुले जयश्री’ (चेरी टोमॅटो); डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ‘पीडीकेव्ही तिलक’ (भात), ‘पीडीकेव्ही यलो गोल्ड’ (सोयाबीन), ‘पीडीकेव्ही गोल्ड’ (ग्लॅडिओलस) तर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या ‘पीए ७४०’ (देशी कापूस), ‘परभणी शक्‍ती’ (ज्वारी), ‘शिवाई’ (चिंच) या वाणांचा समावेश आहे.

Web Title: Ratnagiri News Agriculture research committee report