जीएसटी कमी झाला तरी पोटाला चिमटा कायम

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 नोव्हेंबर 2017

चिपळूण - हॉटेलच्या जेवणावरील व खाद्यावरील जीएसटी १८ ऐवजी ५ टक्के केल्याची घोषणा नुकतीच केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केली. तरीही शहरातील हॉटेलमधील पदार्थांचे दर कमी झालेले नाहीत. काही हॉटेलमालक ५ टक्के कर आकारत असले तरी पदार्थांच्या मूळ किमती वाढवण्यात आल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना हॉटेलचे जेवण अद्यापही महाग आहे.

जीएसटी लागू झाल्यापासून ग्राहकांच्या खिशाला हॉटेल परवडत नाही, असे झाले होते. ४० टक्के व्यवसाय कमी झाल्याची खंत हॉटेलमालक बोलून दाखवत. जीएसटी लागू झाल्यामुळे हॉटेलचे जेवण नको म्हणायची वेळ आली होती. १८ टक्के जीएसटीमुळे साऱ्या कुटुंबाने एकत्र जेवायला जाताना आधी विचार करावा लागत होता. मात्र, आता तो पाच टक्‍क्‍यांवर आल्याने थोडे हायसे वाटले आहे. मात्र त्याचा प्रत्यक्ष अंमल होत नाही.

चिपळुणातील लक्‍झरी, डिलक्‍स हॉटेलमध्ये ग्राहकांना जीएसटीसहीत बिल दिले जाते. त्यात ५ टक्के जीएसटी घेतल्याचे स्पष्ट नमूद असते. परंतु पदार्थाच्या किमती जीएसटी येण्यापूर्वी असलेल्या किमतीपेक्षा वाढवण्यात आल्या आहेत. त्यामुळे हॉटेलचे जेवण अद्यापही महाग आहे. घरगुती खानावळ आणि छोट्या हॉटेलमध्ये थाली पद्धतीचे जेवण मिळते. तेथे ग्राहकांच्या रांगा लागलेल्या असतात. पूर्वी शाकाहारी थाळी ७० रुपयाला मिळत होती. जीएसटी लागू झाल्यानंतर ती ११० रुपयाला मिळते. मांसाहारी थाळी ११० रुपयाला मिळत होती ती १६० रुपयाला मिळते. जीएसटीचा दर कमी केल्यानंतर थाळीचे दरही कमी व्हायला हवे होते. अनेक व्यावसायिकांनी दर जैसे थे ठेवल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे.

Web Title: Ratnagiri News GST on food issue