रत्नागिरी जिल्ह्यात वीरमध्ये ढगफुटी, रस्ता वाहून गेला

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 ऑक्टोबर 2017

चिपळूण - चिपळूण तालुक्‍यातील वीर येथे  रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास ढगफुटीसारखा पाऊस झाला. यामध्ये वाहळ ते वीर सार्वजनिक बांधकाम विभागाचा रस्ता वाहून गेला आहे. काही ठिकाणी डोंगरातील माती रस्त्यावर आली आहे. त्यामुळे वीर गावाचा संपर्क तुटला आहे. सुमारे दीड ते दोन तास सुरू असलेल्या पावसाने काही घरांची पडझड झाली.

चिपळूण - चिपळूण तालुक्‍यातील वीर येथे  रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास ढगफुटीसारखा पाऊस झाला. यामध्ये वाहळ ते वीर सार्वजनिक बांधकाम विभागाचा रस्ता वाहून गेला आहे. काही ठिकाणी डोंगरातील माती रस्त्यावर आली आहे. त्यामुळे वीर गावाचा संपर्क तुटला आहे.

सुमारे दीड ते दोन तास सुरू असलेल्या पावसाने काही घरांची पडझड झाली. पिकांचेही नुकसान झाले.पंचनाम्यानंतरच नुकसानीचा अंदाज येणार आहे. या घटनेची माहिती तलाठी व पोलिसपाटील यांनी प्रशासनाला दिल्यानंतर या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली. सार्वजनिक बांधकामचे अधिकारी उद्या सकाळी घटनास्थळी जाणार आहेत. रस्ता दुरुस्तीसह उपाययोजना सुरू करणार आहेत.

गतवर्षी याच परिसरात ३५० मिमी पाऊस झाला होता. त्यामुळे ओढ्यावरील पूल व मुख्य रस्ता वाहून गेला होता. दरम्यान आजच्या पावसासंदर्भात बोलताना तहसीलदार जीवन देसाई यांनी सांगितले की, मिळालेल्या माहितीनुसार मोठा पाऊस झाला आहे. मात्र ढगफुटी म्हणाता येणार नाही. रात्री मदतकार्य शक्‍य झाले नाही. उद्या काम सुरू करण्यात येणार आहे. पोलिस व प्रशासनाला सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत.