कोहिनूर बीच रिसॉर्टमध्ये 24 लाखांवर डल्ला 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 जुलै 2017

रत्नागिरी - भाट्ये येथील रिसॉर्टमध्ये स्टोअर रूममधून सुमारे 24 लाख रुपयांची चोरी झाली. हॉटेल मॅनेजमेंट महाविद्यालयाच्या फीची जमा झालेली रक्कम चोरट्याने लांबवली. लोखंडी कपाटातील तिजोरी फोडून ही चोरी करण्यात आली. 

शहराजवळील भाट्ये येथील कोहिनूर बीच रिसॉर्टच्या स्टोअर रूममधील कपाटाच्या तिजोरीवर चोरट्याने डल्ला मारला. तिजोरीतून 23 लाख 90 हजार रुपये लांबविण्यात आले. शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. हा प्रकार गुरुवारी (ता. 27) सकाळी पावणेदहाच्या सुमारास घडला. फिर्यादी रमनीकसिंग संधू (वय 45, रा. मजगाव रोड) हे भाट्ये येथील या रिसॉर्टचे व्यवस्थापक आहेत. आज सकाळी ते कामावर आल्यानंतर स्टोअर रूममधील लोखंडी कपाटातील तिजोरी फोडल्याचे त्यांना आढळले.