रत्नागिरीत कंत्राटी कामगारांनी उचलला कचरा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 ऑगस्ट 2017

रत्नागिरी - पालिका कर्मचाऱ्यांच्या सामूहिक रजा आंदोलनाला रत्नागिरीत चांगला प्रतिसाद मिळाला. पालिकेमध्ये पूर्णतः शुकशुकाट होता; मात्र कंत्राटी कर्मचारी कार्यरत राहिल्यामुळे काही प्रभागांतील कचरा नेहमीप्रमाणे उचलला गेला. त्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली नाही, अशी माहिती पालिकेतून मिळाली.

शासनस्तरावर मागण्यांच्या संदर्भात बैठकांचे आयोजन करूनही त्यावर निर्णय झालेला नव्हता. त्यामुळे सर्व संघटनांनी एकत्रित येऊन शासनाविरोधात लढा पुकारण्याचा निर्धार केला. रत्नागिरी नगरपालिका, कास्ट्राईब कर्मचारी संघटना यांनीही त्याला पाठिंबा दिला. आज सकाळी पालिकेपुढे सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी 

निदर्शने केली. प्रलंबित मागण्यांचे निवेदन संघटनेतर्फे निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित घोरपडे यांना देण्यात आले. कामासाठी आलेल्या नागरिकांना माघारी परतावे लागले. या आंदोलनाचा परिणाम कचऱ्यावर होईल अशी भीती होती; मात्र कंत्राटी कामगारांनी सकाळच्या सत्रात काही प्रभागातील कचरा उचलला होता. काही गाड्या भरून टाकण्यात आल्या. त्यामुळे बाका प्रसंग टळला.

टॅग्स