कोयनेच्या वीजनिर्मितीवर मर्यादा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 मे 2018

चिपळूण - कोयना धरणातील वीजनिर्मितीसाठी आरक्षित केलेला पाणीसाठा संपल्यामुळे कोयना प्रकल्पाच्या वीजनिर्मितीवर मर्यादा आली आहे. राज्यात उष्णतेची लाट पसरलेली असताना कोयनेच्या वीजनिर्मितीवर मर्यादा आल्यामुळे विजेच्या नियोजनाचे मोठे संकट वीजनिर्मिती कंपनीसमोर आहे.

चिपळूण - कोयना धरणातील वीजनिर्मितीसाठी आरक्षित केलेला पाणीसाठा संपल्यामुळे कोयना प्रकल्पाच्या वीजनिर्मितीवर मर्यादा आली आहे. राज्यात उष्णतेची लाट पसरलेली असताना कोयनेच्या वीजनिर्मितीवर मर्यादा आल्यामुळे विजेच्या नियोजनाचे मोठे संकट वीजनिर्मिती कंपनीसमोर आहे. १ जूनपासून पाणी वापराचे तांत्रिक वर्ष नव्याने सुरू होणार आहे. त्यानंतर कोयनेची वीजनिर्मिती सुरळीत सुरू होण्याची शक्‍यता आहे. 

कोयना धरणात पाणी साठविण्याची क्षमता १०५.२५ टीएमसी आहे. धरणातील पाण्याचे वाटप कृष्णा पाणी वाटप लवादाच्या निर्देशाप्रमाणे केले जाते. पश्‍चिमेकडील टप्पा १ ते ४ मधून वीजनिर्मितीसाठी ६७.५० टीएमसी पाणीसाठा आरक्षित आहे. ३१ मेपर्यंत महानिर्मिती कंपनीकडून या पाण्याचे नियोजन केले जाते. 

यावर्षी आरक्षित पाणीसाठा २८ मेपर्यंत संपल्यामुळे वीजनिर्मितीवर मर्यादा आली आहे. धरणात ३० टीएमसीहून अधिक पाणीसाठा आहे. टप्पा १ व २ मधील ८० मेगावॉट क्षमतेचे एक मशीन चालविले जात आहे. कोयना धरण पायथा विद्युतगृहातील दोनपैकी एक मशीन चालू ठेवून २० मेगावॉट वीजनिर्मिती केली जाते. म्हणजेच प्रकल्पातून जेमतेम १०० ते १५० मेगावॉटच्या दरम्यान वीजनिर्मिती सुरू आहे. 

कोयना धरणातील पाणी वाटपाचे नवीन वर्ष १ जूनपासून सुरू होणार आहे. धरणात पाणीसाठा मुबलक शिल्लक आहे. पाऊस सुरू होईपर्यंत हा पाणीसाठा वीजनिर्मितीसाठी पुरेल. त्यामुळे काळजीचे कारण नाही.
- अनंत फळके,
कर्मचारी, 
कोयना धरण व्यवस्थापन विभाग

Web Title: Ratnagiri News limitations on electricity Manufacture in Koyana