बंदर विकासात मंडणगडकडे दुर्लक्ष

सचिन माळी
सोमवार, 28 मे 2018

मंडणगड - तालुक्‍यातील बंदर विकासाकरिता पायाभूत सुविधा विकसित करण्याची मोठी संधी आहे. सीआरझेडसंदर्भात घेतलेल्या नव्या निर्णयामुळे परिस्थितीत बदल अपेक्षित आहे. अरबी समुद्र व सावित्रीच्या संगमावर वसलेल्या मंडणगड तालुक्‍यातील बंदरे विकसित करण्यासाठी शासनाने कोणतेही धोरण आखलेले नाही. बंदर विकासात मंडणगड तालुक्‍याला स्थान नाही का, अशी प्रतिक्रियाही व्यक्त होत आहे.

कोकणातील पहिले व्यापारी बंदर असा लौकिक लाभलेल्या व ब्रिटिशांची वखार म्हणून इतिहासास ओळख असणारे बाणकोटही आज दुर्लक्षित आहे. येथे जहाज बांधणी कारखाना आणणे व बंदर विकासाची केवळ चर्चा सुरू आहे. तीनशे कोटीच्या बाणकोट बागमांडला सागरी सेतूचे काम सध्या सुरू आहे. जिल्ह्याचा समुद्र किनारा २२१ किलोमीटर लांब असून त्यात ११ प्रमुख बंदरे आहेत. येथील बंदर विकासाची कामे न झाल्याने मच्छीमार व्यावसायिक व जनतेमध्ये तीव्र नाराजी आहे.

तालुक्‍यातील सावित्री नदीच्या किनारपट्टीवर अनेक गावे वसली असून त्या गावांमधून अद्यापही काही ठिकाणी प्रवासी जलवाहतूक व मालाची ने-आण चालू असते. येथील मच्छीमार याच खाडीतून व अरबी समुद्रात मच्छीमारी करून उदरनिर्वाह करतात. येथे बंदर विकासाची कामे न झाल्याने येथील जलवाहतूक तसेच मच्छीमारी व्यावसायिकांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. किनारपट्टीवर बंदर लगतच्या सुसज्ज जेटी, प्रवासी निवारे, प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय, धूपप्रतिबंधक बंधारे, संरक्षक भिंती, अशी कामे अपेक्षित आहेत. तालुक्‍यातील जेटींचे नूतनीकरण व नवीन जेटींची निर्मिती अनेक वर्ष झाली नाही.  

या बंदरांचा हवा विकास
वेसवी, उमरोली, म्हाप्रळ, निगडी, उंबरशेत, गोठे बंदरवाडी, पडवे, शिपोळे 

Web Title: Ratnagiri News Mandangad Port development issue