रत्नागिरी: श्रीकृष्ण जोशी यांचे निधन; देवरूखमधील स्वाईन फ्लूचा पहिला बळी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 जुलै 2017

देवरूख (जि. रत्नागिरी) - स्वाईन फ्लूची लागण झाल्याने कोल्हापूर येथील रुग्णालयात उपचारादरम्यान येथील श्रीकृष्ण ऊर्फ किशोर जोशी (वय 47) यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या निधनामुळे देवरूखमधील स्वाईन फ्लूचा पहिलाच बळी गेला आहे.

अभियांत्रिकीचे शिक्षण झालेले जोशी साडवली येथील स्मिथ ऍण्ड नेफ्यू कंपनीत व्यवस्थापक पदावर कार्यरत होते. त्यांच्या निधनामुळे दु:ख व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या आठ दिवसांपासून आजारी असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. प्रथम स्थानिक रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. मात्र नंतर कोल्हापूर येथे त्यांना हलवावे लागले. दरम्यान कोल्हापूरमध्येच त्यांना स्वाईन फ्लू झाल्याचे निदर्शनास आले. तेथेच त्यांचे निधन झाले.