झाड कोसळून महामार्ग ठप्प; अधिकारी गाडीतून उतरलेच नाहीत!

संदेश सप्रे
बुधवार, 19 जुलै 2017

कुरधुंडा येथे महामार्गावर झाड कोसळून महामार्ग ठप्प

देवरुख (जि. रत्नागिरी) : मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगंमेश्वर तालुक्यातील कुरधुंडा येथील पीर जैनुद्दीन बाबांच्या दर्ग्यासमोर सकाळी १० वाजण्याच्या सुमारास एक मोठे झाड महामार्गावर कोसळल्याने सुमारे एक तास वाहतूक ठप्प झाली होती.

कुरधुंडा येथील सरपंच जमुरत अलजी व तंटांमुक्ती अध्यक्ष तैमुर अलजी यांनी पुढाकार घेत गावातील तरुणांना त्वरीत संपर्क करून महामार्गावरील पडलेले झाड तोडून महामार्ग मोकळा केला. त्यांच्या मदतीसाठी सोनगिरीचे माजी सरपंच इम्तियाज कापडी, रजा अलजी, मुकत्यार दसुरकर, तुषार महाडीक, वाहीद फकीर आदींनी मदतकार्यास हातभार लावला.

दरम्यान, महामार्गावर झाड कोसळले त्या क्षणी भारत सरकारची एम.एच. ०८ एफ ०४७५ ही गाडी त्या ठिकाणी असताना ते मदतकार्यासाठी गाडीतून खाली उतरलेदेखील नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली.