रत्नागिरी तालुक्यात वादळी पावसाने नुकसान

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

पावस -  रत्नागिरी तालुक्‍यातील पावस परिसरात गुरुवारी रात्री वीजंच्या कडकडाटासह वादळी पाऊस झाला. याचा फटका मेर्वी येथील खालची म्हादयेवाडीतील घराला बसला. एकनाथ रामचंद्र म्हादये यांची विंधन विहिर व घराशेजारी वीज पडून नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही मनुष्यहानी झाली नाही.

गुरुवारी रात्री 11 नंतर विजांचा कडकडाटासह जोरदार पावसाने सुरवात केली. मेर्वी खालची म्हादये वाडीतील एकनाथ रामचंद्र म्हादये यांच्या घराजवळ असलेल्या विंधन विहिरीवर वीज कोसळली. त्यामुळे त्याची मोडतोड झाली. विहिरीच्या विजेच्या वायरमधून वीज घरात घुसली. मिटर भस्मसात करून घराच्या भिंतीला तडा गेला. ही वीज लादीवर अंथरुणावर झोपलेल्या अविनाशच्या जवळून स्पर्श करून भिंतीला तडा देवून पाठीमागे बाहेर पडून गेली. घरातील वायरिंग, मिटरसह अनेक वस्तूंचे नुकसान झाले आहे.

मेर्वी सजाच्या तलाठी श्रीमती कदम, पोलिसपाटील कुरतडकर, सरपंच खर्डे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. वादळी वाऱ्यामुळे पावस परिसरात अनेक विद्युत वायर व गंजलेले खांब तुटल्याने या भागातील वीज पुरवठा खंडित दहा तास खंडीत झाला.