शिवरायांच्या पुतळ्याचे गुरुवारी लोकार्पण - राजन साळवी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 ऑक्टोबर 2017

राजापूर - राजापूरचा मानबिंदू असलेल्या जवाहर चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या उभारण्यात आलेल्या पूर्णाकृती पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्याची प्रतीक्षा संपली आहे. गुरुवारी (ता. १२) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या पुतळ्याचे लोकार्पण होणार असल्याची माहिती आमदार राजन साळवी यांनी दिली.  

हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी ब्रिटिशांना दहशत मिटावी म्हणून त्या काळामध्ये ब्रिटिशांची राजापूरची वखार लुटली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या अनेक पाऊलखुणा आजही राजापुरात आहेत. त्यापैकी एक म्हणजे जवाहर चौकामध्ये असलेल्या पुतळ्याचा समावेश आहे. या पुतळ्याचे पालिका, शिवस्मारक जीर्णोद्धार समिती आणि शिवप्रेमींच्या पुढाकाराने सुशोभिकरण करण्यात आले आहे. त्यातून या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला असून त्या ठिकाणी पाली दरवाजाही उभारण्यात आला आहे.

या पुतळ्याच्या सुशोभीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. गुरुवारी (ता. १२) शिवसेना पक्षप्रमुख ठाकरे यांच्या हस्ते त्याचे लोकार्पण सकाळी ९.३० वाजता जवाहर चौकात होणार आहे. या वेळी पालकमंत्री रवींद्र वायकर उपस्थित राहणार आहेत.