देवरुखात विविध उपक्रमांनी शिवजयंती सोहळा

देवरुखात विविध उपक्रमांनी शिवजयंती सोहळा

साडवली - देवरुख येथे संगमेश्वर तालुका क्षत्रिय मराठा समाजाच्यावतीने मराठा भवन येथे शिवजयंती सोहळा उत्साहात साजरा झाला. या निमित्ताने महिपतगडावरुन शिवज्योत आणली होती. या ज्योतीचे स्वागत देवरुख ग्रामदेवता सोळजाई मंदिरापासुन मराठा भवनपर्यंत सवाद्य मिरवणुकीने करण्यात आले.

या मिरवणुकीत विविध ऐतिहासिक देखावे यांचे चित्ररथ सादर करण्यात आले. शिवशाहीर पोवाडे, दानपट्टा, कवायती यांचे आकर्षण या मिरवणूक लक्षवेधी ठरले. सर्व परिसर शिवरायांच्या जयजयकाराने  दुमदुमुन गेला होता. तालुक्यातील शिवप्रेमी उत्साहाने मिरवणुकीत सामिल झाले होते.

या निमित्ताने बालगोपालांसाठी किल्ला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या. स्वातंत्र्यसैनिक, वीरमाता, वीरपत्नी यांचा सन्मान करण्यात आला. सदानंद आग्रे यांनी आपल्या व्याख्यानातून शिवरायांचा तेजस्वी इतिहास उलगडला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com