खेर्डी शाळेच्या विद्यार्थ्यांना निसर्ग सान्निध्यात शिक्षण

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 सप्टेंबर 2017

खेर्डी-चिंचघरी (सती) प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी निसर्गाच्या सान्निध्यात पाठ्यपुस्तकातील पाठांचे शिक्षण घेतले.

चिपळूण - खेर्डी-चिंचघरी (सती) प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी निसर्गाच्या सान्निध्यात पाठ्यपुस्तकातील पाठांचे शिक्षण घेतले. या विद्यालयात वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम घेऊन प्रत्येक विद्यार्थ्याला आनंदी वातावरणात शिक्षण 
दिले जाते. 
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रअंतर्गत पाठ्यक्रमांचे अध्यापन ज्ञानरचनावादानुसार पाठ घेऊन केले जाते. याअंतर्गत चार भिंतीत वर्गात दैनंदिन पाठ न घेता पाठाचा विषय लक्षात घेऊन प्रत्येक शिक्षकाने चिंचघरी गावातील नदी व सभोवतालच्या परिसरात विद्यार्थ्यांना नेऊन तेथे पाठ घेतला व निसर्गाचा आस्वादही लुटला. हिरवळीवर विद्यार्थ्यांचे विविध खेळ घेण्यात आले. या उपक्रमासाठी मुख्याध्यापक अरविंद सकपाळ, मनीषा कांबळी, संदेश सावंत, रश्‍मी राजेशिर्के, रिद्धी पालांडे, अपूर्वा शिदे, विनया नटे, संगीता झगडे, वृषाली राणे, अर्चना देशमुख, प्रियांका पाटील यांनी मेहनत घेतली.

Web Title: ratnagiri news shool teaching in nature