राजापूर पंचायत समिती होणार विजेसाठी स्वयंपूर्ण

राजेंद्र बाईत
सोमवार, 16 ऑक्टोबर 2017

राजापूर - वारंवार खंडित होणारा वीजपुवठा आणि भरमसाट येणाऱ्या वीजबिलामुळे सारेच त्रस्त आहेत. अशा स्थितीमध्ये प्रायोगिक तत्त्वावर जिल्ह्यातील एका पंचायत समितीच्या इमारतीवर सौरऊर्जेचे पॅनेल बसविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी राजापूर पंचायत समितीची निवड झाली आहे. त्यामुळे पंचायत समिती विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होणार आहे. 

सुमारे पंधरा ते वीस लाखांचा हा प्रकल्प असून, निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. लवकरच कार्यालयाच्या इमारतीवर सोलर पॅनेल बसविण्याचे काम सुरू होईल, अशी माहिती सभापती सुभाष गुरव यांनी दिली. यावर्षी कमी पडलेल्या पावसाचा फटका वीजनिर्मितीला बसला आहे. त्यामुळे राज्यात भारनियमन सुरू आहे. भारनियमनामुळे नागरिक त्रस्त आहेत. वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे शासकीय कार्यालयातील ऑनलाईन कामालाही फटका बसत आहे. 

शासनाच्या महाऊर्जा विभागातर्फे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या इमारतीसह एका पंचायत समिती कार्यालयाच्या इमारतीवर सौरऊर्जा पॅनेल बसविण्यात येणार आहे. हा प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येणार असून, त्यासाठी राजापूर पंचायत समितीची निवड झाली आहे. त्यासाठी सभापती सुभाष गुरव, पंचायत समितीचे सहायक गटविकास अधिकारी मुरलीधर वाघाटे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता विजय मेंगे यांनी पाठपुरावा केला. 

राजापूर पंचायत समितीच्या इमारतीवर सौरऊर्जेचे पॅनेल बसविण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे. सुमारे पंधरा-वीस लाखांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. सध्या हे काम निविदा प्रक्रियास्तरावर असल्याची माहिती ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता मेंगे यांनी दिली.

महाऊर्जा विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या सौरऊर्जेच्या प्रकल्पासाठी राजापूर पंचायत समितीची निवड झाली आहे. सध्या हे काम निविदास्तरावर असून, या प्रकल्पाच्या माध्यमातून लवकरच पंचायत समिती विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होईल.
-सुभाष गुरव, सभापती